Bharat GPT देणार ChatGPT ला आव्हान! कमाल करणार भारतीय तंत्रज्ञान

| Updated on: Dec 28, 2023 | 9:38 AM

Jio Bharat GPT | Reliance Jio Infocomm चे चेअरमन आकाश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. जिओ आता AI प्लॅटफॉर्मवर लवकरच दमदार खेळी खेळणार आहे. हा एकप्रकारचा Bharat GPT असेल. Jio स्वतःच्या OS वर काम करत आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईची साथ मिळणार असल्याची माहिती आकाश अंबानी यांनी दिली.

Bharat GPT देणार ChatGPT ला आव्हान! कमाल करणार भारतीय तंत्रज्ञान
Follow us on

नवी दिल्ली | 28 डिसेंबर 2023 : ChatGPT ला टक्कर देण्यासाठी आकाश अंबानी मोठी तयारी करत आहे. याविषयीची माहिती त्यांनी शेअर केली. त्यानुसार, Reliance Jio Infocomm, Bharat GPT वर काम करत आहे. हा प्रकल्प इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Mumbai) यांच्या सहाय्याने तयार करण्यात येत आहे. दोघांची या प्रकल्पासाठी भागीदारी ठरली आहे. आयआयटी, मुंबईच्या वार्षिक टेकफास्ट या कार्यक्रमात आकाश अंबानी यांनी ही माहिती दिली. Open AI च्या ChatGPT शी भारत जीपीटीची टक्कर सामना होईल. याविषयीची माहिती PTI ने दिली आहे.

काय आहे Jio 2.0

आकाश अंबानी यांनी Jio 2.0 आणि त्यांच्या नवीन प्रकल्पाविषयीची माहिती यावेळी दिली. त्यासाठी एक दमदार ईको सिस्टिम विकसीत करण्यावर त्यांनी भर दिला. रिलायन्स जिओने आयआयटी मुंबईसोबत त्यासाठी समंजस्य करार केला आहे. generative AI तयार करणे आणि बहुभाषिक मॉडेल विकसीत करण्याची तयारी करण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान ChatGPT सारखे असेल

हे सुद्धा वाचा

TV OS वर काम सुरु

Bharat GPT या प्रकल्पाशिवाय आकाश अंबानी आणि त्यांची टीम Jio, अजून एका महत्वकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. हे एक टेलिव्हिजन तंत्रज्ञान आहे. त्यातंर्गत कंपनी स्वतःच्या टीव्हीसाठी एक ऑपेरिटिंग सिस्टिम तयार करत आहे. त्यामुळे जिओला बाजारात एक मोठा दबदबा तयार करता येईल.

काय आहे ChatGPT

ChatGPT हे एक कृत्रिम बुद्धीमतेचे टूल आहे. हे एक चॅटबॉट आहे. ते तुमच्या अनेक प्रश्नांना उत्तर देण्यासह तुमच्यासाठी कंटेट रायटिंग करण्यासाठी उपयोगी ठरते. त्याच्या मदतीने समाज माध्यमांवर पोस्टपासून ते पत्र, लेख लिहण्यापर्यंत अनेक कामे करता येतील. तुम्हाला एखाद्या विषयावर लिहायचे असेल तर त्यासंबंधीचे विविध विषय, त्याचे हेडिंग शोधण्याचे आणि त्यावर लिहिण्याचे काम हे तंत्रज्ञान लिलया करते. ChatGPT ला OPEN AI या कंपनीने तयार केले आहे.