Marathi News Technology Cheapest smartwact available on flipkart realme dizo boat storm fire boltt talk smartwatch
हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस लेव्हल ते SPO2, अनेक दमदार फीचर्ससह सुसज्ज टॉप 4 स्मार्टवॉच, किंमत 2500 रुपयांहून कमी
ज्याप्रमाणे मोबाईल हा फक्त कॉल्स आणि मेसेजपुरता मर्यादित राहिला नाही, त्याचप्रमाणे आता हातातील घड्याळंदेखील आधुनिक झाली आहेत आणि काळाबरोबरच इतरही अनेक गोष्टी त्यामध्ये पाहायला मिळत आहेत.
1 / 5
ज्याप्रमाणे मोबाईल हा फक्त कॉल्स आणि मेसेजपुरता मर्यादित राहिला नाही, त्याचप्रमाणे आता हातातील घड्याळंदेखील आधुनिक झाली आहेत आणि काळाबरोबरच इतरही अनेक गोष्टी त्यामध्ये पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्मार्टवॉचेसमध्ये हार्ट रेट मॉनिटरींग, स्ट्रेस लेव्हल, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि एक्सरसाइज मोड यांचाही समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला 3 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणार्या अशाच काही स्मार्टवॉचेसबद्दल सांगणार आहोत.
2 / 5
boAt Storm स्मार्टवॉच Flipkart वरून 2299 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टवॉचमध्ये युजरला 1.3 इंचांचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले बाजूने कर्व्ह्ड आहे. यामध्ये अनेक वॉच फेस देण्यात आले आहेत. यासोबतच रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी SPo2 सेन्सर देण्यात आला आहे. यात डेली अॅक्टिव्हिटी ट्रॅकर आणि 9 स्पोर्ट्स मोड आहेत.
3 / 5
DIZO Watch 2 Flipkart वरून 2499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच, या स्मार्टवॉचमध्ये म्युझिक कंट्रोल, कॅमेरा कंट्रोल, स्मार्ट नोटिफिकेशन, अगदी कॉल रिजेक्शन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. अलार्मपासून स्टेप काउंटरपर्यंत इतर फीचर्सही यात उपस्थित आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाचा डिस्प्ले आहे. यासोबतच यामध्ये ब्लड ऑक्सिजन आणि हार्ट रेट मॉनिटर फीचर देण्यात आले आहे.
4 / 5
Realme Watch 2 Flipkart वरून खरेदी करता येईल. यात 1.4 इंचांचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. यासोबतच रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्याचे फीचरही यामध्ये देण्यात आले आहे. यामध्ये 100 हून अधिक वॉच फेस देण्यात आले आहेत, जे युजर्ससाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
5 / 5
तुम्ही जर ब्लूटूथ कॉलिंगसह स्मार्टवॉच शोधत असाल तर आज आम्ही 3000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या एका खास स्मार्टवॉचबद्दल सांगणार आहोत. फायर-बोल्ट टॉक ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच (Fire-Boltt Talk Bluetooth Calling Smartwatch) असे या वॉचचे नाव आहे. या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा आहे, तसेच यात 1.28 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यासाठी SPO2 सेन्सर देण्यात आला आहे.