मुंबई : भारत सरकारकडून बंदी घालण्यात आलेले 59 अॅप्स अकार्यक्षम (नॉन फंक्शनल) झाले (Chinese Apps TikTok Not Working In India) आहेत. काल चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घालण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. यानंतर आज याबाबत अंमलबजावणी करण्यात आली आहे. यानुसार टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारखे भारतातील चिनी अॅप्स बंद करण्यात आले आहेत. (Chinese Apps Blocked In India)
टिक टॉक, शेअर इट, हॅलो यांच्यावर भारतात अॅप स्टोअरमध्ये बंदी घातल्याचा अर्थ या अॅप्सपैकी कोणालाही भारतात डेव्हलपर सपोर्ट मिळत नाही. परिणामी, कोणीही आता ते नव्याने डाऊनलोड करता येत नाही. तर आधीपासून हे अॅप ज्यांनी डाऊनलोड केलेले आहेत, ते वापरकर्ते अॅपमध्ये प्रवेश करु शकणार नाहीत. हे आज विशेषतः जास्त धोकादायक आहे, कारण बहुतेक सायबर हल्ले अशा अॅपच्या माध्यमातून यूजर्सना लक्ष्य करतात.
प्रिय युजर्स, आम्ही भारतीय सरकारच्या निर्देशांचे पालन करत 59 अॅप्स ब्लॉक करण्याच्या प्रक्रियेत आहोत. भारतीय वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिकता आहे, असे मॅसेज या अॅप्सच्या वापरकर्त्यांना पाठवण्यात आले आहेत. तसेच त्यानंतर हे अॅप्स पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतात कुठेही या अॅप्स वापर करता येत नसल्याचे दिसत आहेत. (Chinese Apps Blocked In India)
भारतीय सार्वभौमत्व, संरक्षण, एकात्मतेबद्दल पूर्वग्रह दूषित असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने याबाबतचे कठोर पाऊल उचलले आहे. डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे.
भारताकडून चीनच्या ‘या’ अॅपवर बंदी
(Chinese Apps TikTok Not Working In India)
अॅप बंदीचा चीनला कसा फटका?
⦁ चीनच्या 59 अॅपवर बंदी आल्यानं त्यांच्यापासून सर्वाधिक वेगानं वाढणारा बाजार दुरावणार
⦁ चीनपेक्षाही दुप्पट वेगानं वाढणारा ग्राहकवर्गापासून चीनी कंपन्या वंचित राहणार
⦁ चीनी कंपन्यांच्या उत्पन्नावर स्वाभाविकच दुष्परिणाम होणार
Chinese Apps Ban | Tik Tok, Share IT सह चीनच्या 59 अॅपवर बंदी, वाचा संपूर्ण यादीhttps://t.co/sLDoNcwfzu #TikTok #PUBG #chineseapps #indiachinastandoff
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2020
संबंधित बातम्या :
Chinese Apps Ban | चीनच्या 59 अॅपवर बंदी, तुमच्या मोबाईलमधील त्या अॅप्सचं पुढे काय होणार?
Chinese Apps Ban | Tik Tok, Share IT सह चीनच्या 59 अॅपवर बंदी, वाचा संपूर्ण यादी