नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारतातने मोठे पाऊल उचलत टिक टॉक सह 59 चीनी अॅप वर (Tik Tok Pro fake app) बंदी घातली. टिक टॉकवर बंदी घातल्यानंतर आता टिक टॉक प्रो अॅप आलं आहे. पण या अॅपच्या माध्यमातून डेटा चोरीची भीती आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज भारतात अनेक अॅप आहेत ज्यामध्ये टिक टॉकसारखे फीचर दिले आहेत. हे सर्व अॅप इंडियन आहेत असं म्हटलं जाते. पण या अॅपच्या माध्यमातून युझर्सची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे हा नवा टिक टॉक प्रो अॅप डाऊनलोड करणे युझर्ससाठी धोक्याचे ठरु (Tik Tok Pro fake app) शकते.
सध्या अनेक युझर्सला मोबाईलवर व्हॉट्सअॅप आणि टेक्स्ट मेसेज येत आहेत. यामध्ये मेसेजमध्ये म्हटले की, “टिक टॉक अॅप पुन्हा येणार आहे, टिक टॉक प्रो भारतात उपलब्ध आहे.”
या मेसेजसोबत अॅप डाऊनलोड करण्याची एक लिंकही दिली आहे. पण हा सर्व प्रकार युझर्सची फसवणूक करण्याचा आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
युझर्सला टिक टॉक प्रो डाऊनलोड करण्यासाठी जी लिंक पाठवली जात आहे त्या लिंकच्या माध्यमातून युझर्सची फसवणूक होऊ शकते. लिंकवर क्लिक करताच तुम्हाला एक APK फाईल रिडायरेक्ट केली जाईल. ही फाईल डाऊनलोड केल्यास अॅपचा आयकॉन टिक टॉकसारखा तयार केला आहे. त्यामुळे तुम्हाला हे टिक टॉप अॅप वाटेल. पण हा ओपन करताच तुम्हाला कॅमेरा, फोटो, कॉल लॉगसारख्या गोष्टींची परवानगी मागतो.
Dear sir @hydcitypolice @CYBTRAFFIC @cpcybd
Some of my friends got some notifications from online about tiktok pro app, in that there is an URL link once we click on that URL that message has been automatically forwarded to all of our phone contact. Kindly find the attachments. pic.twitter.com/nsrNh9tuOs— Purushotham gowd (@GowdPurushotham) July 4, 2020
अॅप डाऊनलोड केल्यावर ते तुमच्या फोनवर काम नाही करणार. पण बॅकग्राऊंडला हे अॅप काम करत असते आणि तुमच्या मोबाईलमध्ये डेटा चोरु शकते. यासाठी टिक टॉक अॅप समजून यावर क्लिक करु नका, असं सांगितलं जात आहे.
भारतात टिक टॉकला बॅन केले आहे. अॅपवर नवीन व्हिडीओ अपलोड केले जाऊ शकत नाही. कंपनीनेही सरकारचे नियमांचे पालन केले आहे.
दरम्यान, टिक टॉक अॅप हा जगभरातील अनेक देशातील युझर्स वापरतात. या अॅपचा सर्वाधिक वापर भारतात केला जात होता. हे अॅप बंद केल्यामुळे अनेक टिक टॉक स्टार्सने यावर नाराजी व्यक्त केली.
संबंधित बातम्या :
जगभरात सर्वाधिक डाऊनलोडिंग, व्हॉट्सअॅपलाही मागे टाकत टिक टॉक नंबर वन
TikTok App: टिकटॉकच्या अजब गोष्टी, एक फेल अॅप यूट्यूबचा प्रेक्षक खेचणारं एकमेव अॅप कसं झालं?