नवीन वर्षात तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करताय, पण बजेट फक्त 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर चिंता करू नका. कारण आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कार मिळू शकते आणि या कारचा लूकही एकदम क्लासी आहे. तर तुम्हाला यामध्ये मारुती स्विफ्ट, मारुती सुझुकी ऑल्टो के१० या कारचा समावेश केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या कारची किंमत आणि फीचर्स बद्दल, याशिवाय ते तुम्हाला एका वेळी किती मायलेज देऊ शकतात हेही जाणून घ्या.
टाटा कंपनीची ही करा तुमच्या बजेटसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या कारमध्ये तुम्हाला पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी असे तीन पर्याय मिळतात. टाटा पंचची iCNG कार आयकॉनिक अल्फा आर्किटेक्चरवर आधारित आहे, ही कार त्यांच्या सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी खूप लोकप्रिय आहे. कारमध्ये एक आयसीएनजी किट देण्यात आले आहे जे कारला कोणत्याही प्रकारच्या लिकेजपासून वाचवते. कारमध्ये गॅस गळती झाल्यास या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार आपोआप सीएनजी मोडवरून पेट्रोल मोडकडे वळते.
सुरक्षेच्या दृष्टीनेही टाटा पंच ही कार उत्कृष्ट आहे, ड्युअल एअरबॅग्जसह येणाऱ्या या कारमध्ये व्हॉइस असिस्टेड सनरूफही देण्यात आला आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही याच्या 5 कलर ऑप्शनपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. टाटा पंचची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7,22,900 रुपये आहे.
तुम्ही मारुती कंपनीची कार खरेदी करायची असल्यास मारुती स्विफ्ट खरेदी करू शकतात. तुम्हाला मारुती स्विफ्टमध्ये झेड सिरीज इंजिन आणि एस-सीएनजी इंजिन आहे जे 32.85 किमी प्रति किलो मायलेज देऊ शकते. मारुती कंपनीचे या कारची बाजारात तीन सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
मारुती स्विफ्टमध्ये 17.78 सेंटीमीटरची टच स्क्रीन देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या कारमध्ये यूएसबी आणि ब्लूटूथ फीचर्स उपलब्ध आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 8.19 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटच्या नुसार ही कार येणाऱ्या नवीन वर्षात खरेदी करू शकतात.
सर्वात स्वस्त कारपैकी एक म्हणजे ऑल्टो के 10, ही कार बहुतेक लोकांना खूप आवडते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही कार तुम्ही केवळ 5 लाख 73 हजार रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत खरेदी करू शकता. ऑल्टो के१० ही कार १.० लीटर पेट्रोल इंजिन तसेच सीएनजी मोडमध्ये ५६ एचपी आणि ८२.१ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार 33.85 किमी/किलो मायलेज देऊ शकते.