ChatGPT आणि Gemini ला फुटला घाम; चीनचे AI च्या जगात धुमशान, DeepSeek आहे तरी काय?

| Updated on: Jan 28, 2025 | 11:36 AM

DeepSeek China : चीनच्या DeepSeek R1 ची एकच चर्चा सुरू आहे. या 5 कारणांमुळे ChatGPT आणि Gemini पुढे मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. अवघ्या दोनच महिन्यात या नवीन मॉडलने बाजारात नवीन ओळख निर्माण केली आहे.

ChatGPT आणि Gemini ला फुटला घाम; चीनचे AI च्या जगात धुमशान, DeepSeek आहे तरी काय?
चीनची एआयमध्ये दमदार एंट्री
Follow us on

OpenAI ने ChatGPT 2 वर्षांपूर्वी लाँच केले होते. जेव्हा OpenAI चॅटबॉटने बाजारात पाऊल ठेवले, तेव्हा जगभरातील तंत्रज्ञान जुने वाटत होते. त्याचवेळी चीन हा या नवप्रगत तंत्रज्ञानात पिछाडीवर असल्याचे समोर आले होते. तेव्हाच गुगनने पण जेमिनी, मेटा आणि ॲमेझॉनवर AI चॅटबॉट्स आणले. चीन त्यानंतर खडबडून जागा झाला. चीनने Alibaba आणि Baidu प्लेटफॉर्मवर अब्जावधी रूपये खर्च केल्यानंतर आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानचा बॅकलॉग भरून काढला. त्याने एक दमदार मॉडल समोर आणले आहे. DeepSeek एक स्टार्टअप जे ChatGPT आणि दुसरे AI मॉडेल पेक्षा वेगळे आहे.

DeepSeek R1 ची खासियत काय?

DeepSeek R1 हे एआय मॉडेल चीनचे स्टार्टअप DeepSeek ने तयार केले आहे. तर एक महिन्यापूर्वीच डीपसीक R1 लाँच करण्यात आले आहे. हे रिझनिंग मॉडल मार्केट अत्यंत व्हायरल झाले आहे. अत्यंत कमी किंमतीत दमदार कामगिरी करणारे हे तंत्रज्ञान आणण्यात आले आहे. DeepSeek R1 हे ऑगमेंटेड रिजनिंग आणि ॲनालिटिक्ल कॅपेबिलिटीसाठी तयार करण्यात आले आहे. DeepSeek R1 हे एक ॲहव्हास लँग्वेज मॉडल आहे. हे V3 प्रमाणे एक हायब्रिड ऑर्किटेक्चरवर तयार करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

DeepSeek कंपनीचे मुख्य कार्यालय हे चीनमधील हांग्जो या शहरात आहे. आता ही कंपनी कोणी आणि केव्हा सुरू केली याची उत्सुकता आहे. या कंपनीची सुरूवात 2023 मध्ये Liang Wenfeng यांनी केली होती. या कंपनीचे उद्दिष्ट AGI (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स) विकसीत करणे आहे. डीपसीक अल्पावधीतच लोकप्रिय होण्यामागे त्याची कमी किंमत हे मुख्य कारण आहे. DeepSeek R1 ची किंमत 0.55 डॉलर (जवळपास 47 रुपये) प्रति दशलक्ष इनपूट टोकन आणि 2.19 डॉलर (जवळपास 189 रुपये) प्रति दशलक्ष आउटपुट टोकन इतकी आहे.

दोन महिन्यात नवीन तंत्रज्ञान

डीपसीक कंपनीनुसार हे AI मॉडेल केवळ दोन महिन्यात तयार करण्यात आले आहे. तर OpenAI, Microsoft आणि Google याला AI मॉडल तयार करण्यासाठी वर्षे लागले. त्यासाठी मोठा खर्च आला. अब्जावधी रुपये खर्च करण्यात आले. पण DeepSeek ने हे AI मॉडेल तयार करण्यासाठी केवळ 60 लाख डॉलर इतके लागले.