तुम्ही हे वाचलं का? OYO Roomsमध्ये आता आधारकार्ड घेऊन जाण्याची गरज नाही

| Updated on: Apr 13, 2025 | 3:57 PM

नवीन आधार अॅपमुळे ओळख पडताळणी सोपी झाली आहे. QR कोड स्कॅन करून हॉटेल्स, दुकानं आणि परीक्षा केंद्रांमध्ये ओळख पडताळणी होईल. फेक आधार वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि व्यक्तिगत माहितीची सुरक्षा वाढवण्यासाठी UIDAI ने हे अॅप लाँच केले आहे. हे अॅप mAadhaar च्या अपडेटेड असणार आहे.

तुम्ही हे वाचलं का? OYO Roomsमध्ये आता आधारकार्ड घेऊन जाण्याची गरज नाही
OYO Room
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us on

New Aadhaar App : आता नवीन आधार अॅप आला आहे. त्यामुळे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन सोपं झालं आहे. हॉस्पिटल, परीक्षा केंद्र वा दुकानात QR कोड स्कॅन केल्यावर तुमचं काम होईल. त्याशिवाय हॉटेलातही तुमच्यासाठी ही पद्धत फायदेशीर होणार आहे. UIDAI आणि सरकारने एक नवीन डीजिटल आधार अॅप सुरू केलं आहे. पण त्याचं अधिकृत नाव सध्यातरी समोर आलेलं नाही. पण या नव्या अॅपमुळे भारत डीजिटल इंडियाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार आहे. या आधार अॅपच्या द्वारे तुमची ओळख एका सेकंदात पटणार आहे. यूपीआय पेमेंटचं काम ज्या पद्धतीने होतं, त्याच पद्धतीने या नव्या अॅपद्वारे काम होणार आहे.

रिपोर्ट्स नुसार, हे mAadhaar अॅपचं अपडेटेड व्हर्जन असू शकतं. या अॅपचं इंटरफेस आणि टेक्निक अत्यंत सोपी असणार आहे. त्यासाठी सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये अॅप ओपन करावं लागणार आहे. त्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करावं लागेल. त्यामुळे तुमची ओळख व्हेरिफाय होईल. फेक आधारचा होणारा वापर थांबवण्यासाठी UIDAI हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे पर्सनल डिटेल्सची सेफ्टी अधिक वाढणार आहे.

वाचा: सासूने जावयासोबत पळून जाण्याचा बनवला मास्टर प्लान, नवऱ्याला कळालं अन्…

नव्या Aadhaar Appचे फायदे

नव्या आधार अॅपमुळे तुम्हाला ओयो सारख्या हॉटेल्स वा इतर हॉटेल, दुकान किंवा बँकेत वा कोणत्याही पब्लिक प्लेसमध्ये आधार कार्डची फोटो कॉपी देण्याची गरज पडणार नाही. केवळ क्यूआर कोड स्कॅन करून तुमची ओळख व्हेरिफाय होणार आहे. त्यामुळे फास्ट प्रोसेस अधिक सेफ्टी होणार आहे.

या अॅपनंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी फिंगरप्रिंट द्यायची गरज पडणार नाही. तसेच आयरिस स्कॅन करण्याचीही गरज पडणार नाही. व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्णपणे डीजिटल असणार आहे. आधार कार्डची फोटो कॉपी सोबत ठेवणं धोकादायक असतं. अनेकदा तर या फोटोकॉपीचा चुकीचा वापरही होतो. त्यामुळे आता प्रिंटआऊट आणि ओरिजिनल सोबत ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला आधार कॉपी शेअर करण्याचं टेन्शन राहणार नाही. तुमची सर्व डिटेल्स अॅपमध्येच सेव्ह राहील.