108MP कॅमेरावाल्या Redmi स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स

| Updated on: Oct 17, 2021 | 4:59 PM

Redmi ने यावर्षी भारतात आपली Redmi Note 10 सिरीज सादर केली होती. ज्यामध्ये Redmi Note 10 Pro Max हे टॉप-एंड व्हेरिएंट आहे आणि या फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

108MP कॅमेरावाल्या Redmi स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 10 Series
Follow us on

मुंबई : Redmi ने यावर्षी भारतात आपली Redmi Note 10 सिरीज सादर केली होती. ज्यामध्ये Redmi Note 10 Pro Max हे टॉप-एंड व्हेरिएंट आहे आणि या फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे. तसेच या फोनमध्ये 5020 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अमेझॉनवर सुरू असलेल्या सेल दरम्यान स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. (discount offer on Redmi Note 10 Pro Max on amazon)

हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवर सुरू असलेल्या सेलदरम्यान चांगल्या ऑफरमध्ये सूचीबद्ध आहे. वेबसाइटवर सूचीबद्ध माहितीनुसार, यावरील सर्वोत्तम ऑफर 17,749 रुपये आहे. लिस्टमधील माहितीनुसार, या फोनवर 6 महिन्यांची स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी, 9 महिने नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायदेखील देण्यात आला आहे.

फोनचे व्हेरिएंट्स आणि किंमती

Redmi Note 10 Pro Max मध्ये 6 जीबी रॅम प्लस 64 जीबी इंटरनल स्टोरेज स्पेस आहे. या फोनची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. तर या फोनच्या 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. यामधील टॉप व्हेरिएंट असलेल्या 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी व्हेरियंटची किंमत 21 हजार 999 रुपये आहे. ग्राहकांना हा फोन डार्क नाइट, ग्लेशियर ब्लू आणि विंटेज ब्रोंज कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येऊ शकते.

प्रोसेसर

Redmi Note 10 Pro Max मध्ये ड्यूअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड 11 बेस्ड एमआययूआय 12 वर काम करतो. यात एचडीआर सपोर्ट सोबत 6.67 इंचांचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये Adreno 618 GPU सोबत ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर दिला आहे.

शानदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी यात रियर पॅनेलवर क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा दिला आहे. यात 5 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये युजर्संना नाइट मोड 2.0 सह अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत.

इतर बातम्या

12GB/256GB, 50MP बॅक, 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X70 स्मार्टफोन बाजारात, किंमत…

फेसबुकवर पोस्ट करताना विचार करा, नव्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई, पब्लिक फिगर्सवरील टीका रोखण्याचा कंपनीचा प्रयत्न

Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

(discount offer on Redmi Note 10 Pro Max on amazon)