Elon Musk खरेदी करणार नवा स्मार्टफोन, सोशल मिडीयावर पोस्ट करुन सांगितले ब्रँडचे नाव

| Updated on: Sep 25, 2023 | 1:14 PM

जगात सर्वात श्रीमंत असलेले अब्जाधीश इलॉन मस्क यांनी नवा फोन घेणार असल्याचे म्हटले आहे. ते कोणत्या कंपनीचा फोन घेणार आहेत, त्या कंपनीचे नाव सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे.

Elon Musk खरेदी करणार नवा स्मार्टफोन, सोशल मिडीयावर पोस्ट करुन सांगितले ब्रँडचे नाव
ELON MUSK
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 25 सप्टेंबर 2023 : चाहते ज्याची अनेक दिवसांपासून ज्याची वाट पहात होते त्या Apple एप्पल आयफोनची नवीन मालिका iPhone 15 नुकतीच बाजारात दाखल झाली आहे. आता या मालिकेतील एप्पल फोन एप्पलच्या अधिकृत स्टोअर सह ऑनलाईन वेबसाईट आणि रिटेल शॉपवर विकत मिळत आहे. यंदा कंपनीने अनेक नव्या अपडेट फिचरसह आयफोनला लॉंच केले आहे. त्यामुळे हा फोन चर्चेत आहे. याच्या खरेदीसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. आता अब्जाधीश इलॉन मस्क यांनी देखील आयफोन विकत घेण्याचा विचार करीत असल्याचे म्हटले आहे.

एप्पल कंपनीच्या संदर्भात अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अनेकदा वक्तव्य केले आहे. सोशल मिडीयामध्ये मस्क आणि एप्पल यांचा लव्ह आणि हेट रिलेशन नेहमीच चर्चेत असते. परंतू यावेळी मात्र नव्या आयफोन 15 वर इलॉन मस्क एकदम खुश झाल्याचे दिसत आहे. यावेळी आयफोनमध्ये कंपनी जबरदस्त कॅमेरा फिचर दिले आहे. जगप्रसिद्ध फोटोग्राफर स्टीफन विल्केस आणि रियूबेन वू यांनी iPhone 15 Pro Max ने काही फोटो काढून पोस्ट केले आहेत. त्यांच्या या छायाचित्रांचे कौतूक खुद्द टीम कूक यांनी देखील केले आहे.

टीम कूक यांचे ट्वीट –

एप्पल सीईओ टीम कूक यांनी फोटोग्राफर स्टीफन विल्केस आणि रियूबेन वू यांनी नव्या आयफोनने काढलेले फोटो सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत. त्यांनी त्याचे खूप कौतूक केले आहे. टीम कूक यांनी आयफोन 15 प्रो मॅक्सने काढलेले आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ते न्यूयॉर्कच्या Fifth Avenue स्टोअर मध्ये नवीन प्रोडक्टच्या लॉंचिंग प्रसंगी सामील झालेले दिसत आहेत. टीम कूक यांनी शेअर केलेले फोटो पाहून इलॉन मस्क देखील आयफोन 15 प्रो मॅक्सवर खूश झाले दिसत आहेत. त्यांच्या ट्वीटला रिप्लाय देत त्यांनी म्हटले आहे की आय एम बायींग वन ! मस्क यांच्या या ट्वीटवरुन अंदाज व्यक्त केला जात आहे की ते लवकरच आयफोन घेणार आहेत. त्यांना या मॉडेलची पिक्चर क्वॉलीटी खूपच आवडली आहे.

आयफोन 15 ला 12 डिसेंबरला लॉंच केले आहे. कंपनीने आयफोन 15 या नव्या मालिकेत iPhone 15, iPhonr 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max आदी मॉडेल सादर केले आहेत. आयफोन 15 ची किंमत भारतात 79,900 रुपये आहे. तर iPhone 15 Pro Max ची किंमत 1,59,900 रुपयांनी सुरु होतेय तर टॉप मॉडेल किंमत 1,99,900 रु. आहे. त्या 1TB स्टोअरेज आहे.