Meta | नामांतरामुळे फेसबुक ‘मेटा’कुटीला, इस्राईलमध्ये गदारोळ, हिब्रू भाषेतील अर्थ माहित आहे का?

| Updated on: Nov 02, 2021 | 8:06 AM

इस्राईल देशामध्ये हिब्रू भाषा बोलली जाते. ‘मेटा’ या शब्दाचा हिब्रू भाषेत “मृत” असा अर्थ होतो. त्यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यानंतर #FacebookDead या हॅशटॅगसह नेटिझन्सनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला आहे.

Meta | नामांतरामुळे फेसबुक ‘मेटा’कुटीला, इस्राईलमध्ये गदारोळ, हिब्रू भाषेतील अर्थ माहित आहे का?
Facebook Meta
Follow us on

मुंबई : तुमच्या-आमच्या आवडत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या मूळ कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ असे केले आहे. पण यानंतर इस्राईल देशामध्ये मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला आहे. कारण ‘मेटा’ या शब्दाचा हिब्रू भाषेत भलताच अर्थ निघतो. हिब्रू भाषेनुसार ‘मेटा’ म्हणजे “मृत” असा अर्थ होतो.

फेसबुकच्या मूळ कंपनीचे नामांतर

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी गेल्या गुरुवारी एका व्हर्च्युअल न्यूज कॉन्फरन्सला संबोधित करताना सांगितले की “मेटा” कंपनीच्या एकूण मिशनला अधिक चांगल्या प्रकारे समाविष्ट करेल, कारण ते आपल्या युजर्ससाठी “मेटाव्हर्स” तयार करते. “काळाच्या ओघात, मला आशा आहे की आमच्याकडे एक मेटाव्हर्स कंपनी म्हणून पाहिले जाईल आणि मला आमचे काम आणि आमची ओळख अशा पद्धतीने निर्माण करण्याची इच्छा आहे.” असं मार्क झुकरबर्ग म्हणाले. कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तव आणि आभासी जग एकत्र करेल.

वाद कशावरुन?

इस्राईल देशामध्ये हिब्रू भाषा बोलली जाते. ‘मेटा’ या शब्दाचा हिब्रू भाषेत “मृत” असा अर्थ होतो. त्यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यानंतर #FacebookDead या हॅशटॅगसह नेटिझन्सनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. इमर्जन्सी रेस्क्यू सहाय्यक झाका यांनी ट्विटराईट्सना “काळजी करू नका, आम्ही त्यावर काम करत आहोत” असं सांगून धीर देण्याचा प्रयत्न केला.

ट्विटराईट्स काय म्हणतात?

केएफसीवरुनही यापूर्वी वादंग

एका भाषेतील शब्दाचा दुसऱ्या भाषेत भलताच अर्थ निघण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. जेव्हा KFC ही कंपनी 80 च्या दशकात पहिल्यांदा चीनमध्ये आले, तेव्हा त्याचे ब्रीदवाक्य “फिंगर लिकिन गुड” (finger lickin’ good) हे स्थानिक नागरिकांना तितकेसे रुचले नव्हते. मँडरिन चायनिज भाषेत या बोधवाक्याचे शब्दशः भाषांतर “तुमची बोटे खा” असे होते. त्यावेळी चिनी नागरिकांनी कंपनीविरोधात मोठा उठाव केला होता. विशेष म्हणजे, या आंदोलनामुळे कंपनीचे फारसे नुकसान झाले नाही. KFC ही देशातील सर्वात मोठ्या फास्ट फूड चेनपैकी एक आहे.

संबंधित बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?