Facebook ग्रुपमध्ये तुम्हीही शेअर करता अशी माहिती? आताच व्हा सावध नाहीतर…

| Updated on: Mar 18, 2021 | 1:20 PM

फेसबुकने आता आपल्या ग्रुप्ससाठी हानिकारक कंन्टेन्ट ठेवण्याचे नियम जाहीर केले आहेत.

Facebook ग्रुपमध्ये तुम्हीही शेअर करता अशी माहिती? आताच व्हा सावध नाहीतर...
Follow us on

मुंबई : जर आपण फेसबुक ग्रुपवर (Facebook Group) काही शेअर करत असाल तर सावध रहा. कारण, फेसबुकने आता आपल्या ग्रुप्ससाठी हानिकारक कंन्टेन्ट ठेवण्याचे नियम जाहीर केले आहेत. सोशल मीडिया दिग्गजांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा ग्रुप्सला मर्यादित केलं जाईल जिथे धोकादायक माहिती पसरवली जात आहे. (facebook rules start cracking down on groups strict action will be taken on breaking rules)

जर ग्रुपने प्लॅटफॉर्मद्वारे तयार केलेले नियम मोडले तर फेसबुक अशा गटांवर बंदी घालेल. त्याच्या व्यासपीठावरील नियम वारंवार मोडणाऱ्या या गटाच्या सदस्यांवरही कंपनी कारवाई करेल. फेसबुकने ब्लॉग पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, यामुळे लोकांसाठी संभाव्य हानिकारक गट एकत्र करणे बंद होईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गटांवर मर्यादा आणल्या जाईल.

सध्या सोशल मीडियावर अनेक खोट्या आणि फसवणुकीच्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यावर निर्बंध आणण्यासाठी फेसबूक मोठ्या पातळीवर काम करत आहे. कारण, अशा माहितीमुळे यूजर्सचे मोठे नुकसान झाले आहे. हल्लीची तरुणाई यामुळे गुन्हेगारीतही वळली आहे. यामुळे यावर आता कठोर पाऊलं उचलण्याची गरज आहे.

नियम मोडणाऱ्यांवर फेसबुकची करडी नजर

यापूर्वी फेसबुकने एका निवेदनात म्हटले होते की, कोणत्याही गटात उल्लंघन पोस्ट करणार्‍या लोकांना पोस्ट करण्यापासून मर्यादित काळासाठी बंदी घालतील. ही मर्यादा 7 ते 30 दिवसांदरम्यान असू शकते. इतकंच नाही तर ग्रुपमध्ये नवीन सदस्य अॅड करू शकणार नाहीत किंवा फेसबुकवर नवीन ग्रुप तयार करु शकणार नाहीत. (facebook rules start cracking down on groups strict action will be taken on breaking rules)

संबंधित बातम्या – 

जबरदस्त फीचर्ससह दमदार ऑडियो क्वालिटी, Redmi TV X50, X55, X65 भारतात लाँच

WhatsApp ला टक्कर देणारं Signal अ‍ॅप ‘या’ देशात कायमस्वरुपी बॅन

तुमचं Twitter Account अधिक सुरक्षित होणार, ट्विटरकडून नवं फीचर सादर

5 हजाराहून कमी किंमतीत खरेदी करा Samsung Galaxy चा फोन, धमाकेदार आहे ऑफर

(facebook rules start cracking down on groups strict action will be taken on breaking rules)