मुंबई : तुम्ही जर फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम डायरेक्ट मेसेज (DM) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता तुम्हाला या अॅप्समध्ये व्हॉट्सअॅपचं दमदार फीचर मिळणार आहे. हे हे फीचर लाँच केल्यानंतर, वापरकर्ते त्यांचं खासगी चॅट कंट्रोल करु शकतील. या फीचरचे नाव एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे. त्यामुळे कोणीही त्यांचे मेसेजेस वाचू शकणार नाही. (Facebook video and voice call and Instagram DM will get end to end encryption soon, chat will be safe)
मेसेंजरचे प्रोडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर रूथ क्रिकेली यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, युजर्सना अपेक्षा असते की, त्यांचे चॅट्स सुरक्षित राहावेत, खासगी राहावेत, या नव्या सुविधांसह आम्ही त्यांना आश्वस्त करत आहोत. कंपनीने सांगितले की, 2016 पासून त्यांनी एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह वन-ऑन-वन टेक्स्ट चॅट सुरक्षित करण्याचा पर्याय दिला आहे. गेल्या वर्षभरात, मेसेंजरने दिवसाला 150 मिलियनहून अधिक व्हिडिओ कॉलसह ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगच्या वापरात वाढ पाहिली आहे.
क्रिकेली म्हणाले की, “आम्ही आता या चॅट मोड व्यतिरिक्त कॉलिंगमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सादर करत आहोत, जेणेकरून आपण या तंत्रज्ञानासह आपले ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल संरक्षित करण्यासाठी हे फीचर निवडू शकाल, वैयक्तिक संभाषणांना हॅकर्स आणि गुन्हेगारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅप सारख्या अॅप्सद्वारे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आधीच मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे.”
फेसबुकने म्हटले आहे की, तुमचे मेसेजेस आणि कॉलचा कंटेंट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅटमधील संभाषण सुरक्षित आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅटमध्ये एक्सपायरिंग मेसेज फीचरदेखील अपडेट केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, ते काही देशांमध्ये प्रौढांसोबत मर्यादित चाचणी देखील सुरू करणार आहेत, ज्यामुळे त्यांना एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड संदेश आणि इंस्टाग्रामवर समोरासमोर संभाषणासाठी कॉल करण्याची परवानगी मिळेल.
इतर बातम्या
Twitter ची ‘ब्लू टिक’ व्हेरिफिकेशन प्रोसेस पुन्हा बंद, ‘इतके’ दिवस वाट पाहावी लागणार
Whatsapp वेब, डेस्कटॉप युजर्सना फोटो एडिटिंगपासून ते डिसअपियरर्यंतचे सगळे फीचर्स मिळणार!
(Facebook video and voice call and Instagram DM will get end to end encryption soon, chat will be safe)