मुंबई : भारतीय फॅशन अॅक्सेसरीज रिटेल ब्रँड फास्ट्रॅकने (Fastrack) अलीकडेच त्यांचे लेटेस्ट फास्ट ट्रॅक रिफ्लेक्स वोक्स (Reflex Vox) स्मार्टवॉच भारतात लाँच केले आहे. फास्ट्रॅक रिफ्लेक्स (Fastrack Reflex) लाइनअपमधील हे पहिले स्मार्टवॉच आहे. स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाची HD स्क्रीन, Amazon Alexa साठी इनबिल्ट सपोर्ट, 10 दिवसांपर्यंतची बॅटरी, 100 पेक्षा जास्त वॉच फेस आणि मल्टी-स्पोर्ट्स मोड समाविष्ट आहेत. याशिवाय, या वेअरेबलमध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, अॅक्टिव्हिटी ट्रॅकर आणि ब्लड ऑक्सिजन सॅचुरेशन लेव्हल (SpO2) मॉनिटर यांसारख्या हेल्थ फीचर्सचा समावेश आहे.
कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हे वेअरेबल फास्ट्रॅक स्टोअर्स, वर्ल्ड ऑफ टायटन, अधिकृत टायटन डीलर आउटलेट्स, शॉपर्स स्टॉप आणि लाइफस्टाइल रिटेल स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. Fastrack Reflex Vox आजपासून (29 जानेवारी) Fastrack वेबसाइट आणि Amazon द्वारे ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध असेल. अधिकृत वेबसाइटवर सध्या ‘Motify Me’ बटण आहे, जे तुम्हाला स्मार्टवॉचच्या उपलब्धतेबद्दल अपडेट्स प्राप्त करण्यासाठी नोंदणी करू देते.
Fastrack Reflex Vox ची किंमत 6,995 रुपये ठेवण्यात आली आहे. पण हे स्मार्टवॉच 4,995 रुपयांच्या इंट्रोडक्टरी ऑफरवर उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच कार्बन ब्लॅक, ब्लेझिंग ब्लू, शॅम्पेन पिंक आणि फ्लेमिंग रेड या चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. ग्राहक वॉचचा लुक अधिक चांगला बनवण्यासाठी सॉफ्ट सिलिकॉन बँड इंटरचेंज (अदलाबदल) देखील करू शकतात.
Fastrack Reflex Vox smartwatch बद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध नसली तरी कंपनीने काही खास फीचर्सबद्दल माहिती दिली आहे. स्मार्टवॉचमध्ये रेक्टँगुलर 1.69 इंचाची एचडी स्क्रीन आहे आणि ते इनबिल्ट Amazon Alexa ला सपोर्ट करते. स्मार्टवॉच 100 पेक्षा जास्त वॉच फेस आणि मल्टी-स्पोर्ट्स मोडसह येते.
स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर, Sp02 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, अॅक्टिव्हिटी ट्रॅकर, स्ट्रेस मॉनिटर आणि मेंस्ट्रुअल ट्रॅकर आहे. Fastrack Reflex Vox म्युझिक प्लेबॅक कंट्रोल, कॅमेरा कंट्रोल, हायड्रेशन अलर्ट आणि नोटिफिकेशन अलर्ट यांसारख्या फीचर्ससह येतं. कंपनीच्या मते, स्मार्टवॉच 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देते.
इतर बातम्या
11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स
(Fastrack Reflex Vox smartwatch launched in India with alexa)