मुंबई : फेसबुक (Facebook) हे सोशल मीडियाचे (Social media) एक प्रभावी माध्यम आहेत. अस कुणीही नसेल जे दिवसातून एकदा तरी फेसबुक ओपन करुन काय नोटीफिकेशन आलेय, हे बघत नसेल. भारतात कोट्यवधी लोक रोज फेसबुकवर सक्रिय असतात. अनेकांच्या आयुष्यात फेसबुक हे पहिलेच सोशल मीडिया अॅप असून या माध्यमातूनच त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश झाला असेल. फेसबुक हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया अॅप आहे. या अॅपवर तुम्ही तुमचे जुने मित्र शोधू शकता आणि त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. किंवा तुम्ही नवीन मित्र देखील बनवू शकता. बरं, या सर्व गोष्टी जवळपास सगळ्यांनाच माहीत आहेत, पण तुम्ही तुमचा फेसबुक सर्च हिस्ट्री कसा डिलीट (Delete) कराल याचा कधी विचार केला आहे का? या लेखातून त्याबाबत अधिक जाणून घेणार आहोत.
गुगल क्रोम प्रमाणे फेसबुकवरही तुम्ही कोणाला सर्च केले आहे, या प्रत्येक गोष्टीचा तपशील असतो. जर कोणी तुमचे फेसबुक अकाउंट तपासले तर त्यांना कळेल की तुम्ही त्यावर काय शोधले आहे. बरं ते हटवणं हे खूप सोपं काम आहे. तुम्ही जसे गुगल क्रोमची हिस्ट्री डिलीट करता, त्याचप्रमाणे तुम्ही या अॅपची हिस्ट्रीदेखील डिलीट करु शकता. काही क्लिक्समध्ये तुमचे काम पूर्ण होईल.
दरम्यान, जर तुम्ही वेब ब्राउझरद्वारे फेसबुक वापरत असाल तर तुम्हाला फेसबुकच्या अधिकृत साइट Facebook.com वर जावे लागेल. यानंतर, युजर्सना वरच्या उजव्या कोपर्यात दिसणार्या ड्रॉप डाउन बाणावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला प्रायव्हसी अँड सिक्युरिटी या पर्यायावर जाऊन अॅक्टिव्हिटी लॉगवर क्लिक करावे लागेल. येथून, युजर्सना अॅक्टिव्हिटी लॉगमधील लॉग केलेल्या क्रिया आणि इतर क्रियाकलापांच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला सर्च हिस्ट्रीचा पर्याय मिळेल. यानंतर, तुम्ही क्लिअर सर्च वर क्लिक करून सर्च हिस्ट्री डिलीट करू शकता.