लॅपटॉप कीबोर्ड स्वच्छ कसा करायचा? स्वच्छ करताना नुकसान झाले तर? लॅपटॉप कीबोर्ड स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. लॅपटॉप कीबोर्ड वरुन धूळ आणि जंतू काढून टाकण्यासाठी एअर ब्लोअर आणि मायक्रोफायबर कापड वापरा. लॅपटॉप कीबोर्ड वरील जिद्दी डागांसाठी आयसोप्रोपिल अल्कोहोल वापरा, हे तुम्हाला माहिती असेल तर आणखी काही खास टिप्स जाणून घ्या.
लॅपटॉप कीबोर्ड स्वच्छ ठेवल्याने त्याचे आयुर्मान वाढते. हे तुम्हाला माहितच असेल. लॅपटॉप कीबोर्ड वर धूळ, घाण आणि बॅक्टेरिया जमा होतात, ज्यामुळे केवळ डिव्हाईसच्या कार्यक्षमतेवरच परिणाम होत नाही तर आपले आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. आपल्या Laptop चा Keyboard स्वच्छ आणि चांगला ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स खाली दिल्या आहेत, त्या जाणून घेऊया.
1. लॅपटॉप कीबोर्ड साफ करण्यापूर्वी लाईट बंद करा
आपण साफसफाई सुरू करण्यापूर्वी आपला Laptop बंद करा आणि शक्य असल्यास बॅटरी काढून टाका. यामुळे शॉर्टसर्किट किंवा डिव्हाईसचे नुकसान होण्याची शक्यता नाहीशी होईल.
2. एअर ब्लोअर वापरा
लॅपटॉप कीबोर्ड च्या मध्यभागी जमा होणारी धूळ आणि लहान कण काढून टाकण्यासाठी संगणकासाठी डिझाईन केलेले एअर ब्लोअर वापरा. त्याचा काळजीपूर्वक वापर करा जेणेकरून धूळ बाहेर पडेल.
3. मायक्रोफायबर कापड वापरा
लॅपटॉप कीबोर्ड चा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरा. हलक्या ओलसर कापडाने Laptop Keyboard पुसून घ्या. कापड जास्त ओले होणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून डिव्हाईसच्या आत पाणी जाणार नाही.
4. स्वच्छतेसाठी आयसोप्रोपिल अल्कोहोल वापरा
लॅपटॉप कीबोर्ड वरील डाग काढून टाकण्यासाठी आयसोप्रोपिल अल्कोहोल (70 टक्के किंवा त्याहून अधिक) वापरा. कापसाचा चेंडू अल्कोहोलमध्ये भिजवून Laptop Keyboard ची बटणे आणि कडा स्वच्छ करा.
5. कीकॅप काढण्याचा पर्याय
आपला लॅपटॉप कीबोर्ड रिमूवेबल कीकॅप्ससह आला असेल तर ते काळजीपूर्वक काढून टाका आणि स्वतंत्रपणे स्वच्छ करा. साबणाच्या पाण्यात कीकॅप्स स्वच्छ धुवा आणि वाळल्यानंतर परत ठेवा.
6. नियमित साफसफाई करा
धूळ आणि घाण जमा होऊ नये म्हणून दर आठवड्याला किंवा महिन्यातून किमान एकदा कीबोर्ड स्वच्छ करा.
7. जेवताना कीबोर्ड पासून अंतर ठेवा
खाताना किंवा पिताना कीबोर्डचा वापर करू नका. अन्न कण आणि द्रव पदार्थ डिव्हाईसचे नुकसान करू शकतात.
8. सिलिकॉन कव्हर वापरा
Laptop Keyboard वर सिलिकॉन कव्हर लावल्यास घाण आणि धुळीपासून संरक्षण होऊ शकते. हे साफ करणे देखील सोपे आहे.