नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने एका झटक्यात सर्व यूजर्सचे ब्ल्यू टिक हटवले आहेत. राजकारणी असो की खेळाडू, सेलिब्रिटी असो की एखादी संस्था… प्रत्येकाची लिगेसी एका झटक्यात धाडकन कोसळली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रियंका गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान, क्रिकेटपटू विराट कोहली या सर्वांची ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. आता ज्यांना कुणाला ब्ल्यू टिक हवी असेल त्यांना रक्कम भरून ब्ल्यू टिक मिळवावी लागणार आहे.
ट्विटरचा सर्वेसर्वा एलन मस्क यांनी 12 एप्रिल रोजीच एक घोषणा केली होती. 20 एप्रिलपासून ब्ल्यू टिक हटवली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आज रात्रीपासूनच ही ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. ज्यांना ब्ल्यू टिक हवी आहे, त्यांना पैसे खर्च करावे लागणार आहेत. मंथली प्लान घ्यावा लागमार आहे. त्यानंतर या लोकांना ब्ल्यू टिक मिळणार आहे.
संजय राऊत
राहुल गांधी
प्रियंका गांधी
योगी आदित्यनाथ
एकनाथ शिंदे
मायावती
नितीश कुमार
प्रकाश आंबेडकर
पृथ्वीराज चव्हाण
अमिताभ बच्चन
शाहरुख खान
सलमान खान
अक्षयकुमार
आलिय भट्ट
रोहित शर्मा
विराट कोहली
महेंद्रसिंह धोनी
एमके स्टॅलिन
नाना पटोले
नितेश राणे
दरम्यान, काही सेलिब्रिटी, खेळाडू, इतर यूजर्स आणि नेत्यांचे ब्ल्यू टिक कायम ठेवण्यात आले आहेत. त्याचं कारण म्हणजे या लोकांनी ब्ल्यू टिकसाठी पेमेंट केला आहे. ज्यांनी ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजले आहेत, त्यांची ब्ल्यू टिक कायम ठेवण्यात आली आहे, असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे. टेस्लाचे एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांनी ब्ल्यू टिकसाठी पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. एलन मस्कने 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केले होते.
उद्धव ठाकरे
अजित पवार
राज ठाकरे
देवेंद्र फडणवीस
अतुल लोंढे
राष्ट्रवादी