मुंबई : दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) त्यांचा Galaxy M Series मधील नवीन स्मार्टफोन M32 भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी हा स्मार्टफोन 15 ते 20 हजार रुपयांच्या रेंजमध्ये सादर करु शकते. इंडस्ट्री सूत्रांनी सांगितले की, जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा फोन लाँच केला जाऊ शकतो. हा फोन 6.4 इंचांच्या फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्लेसह सुसज्ज आहे. (Galaxy M32 5G | cheapest Samsung 5G smartphone ready to launch in India)
Galaxy M32 चा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतका असेल. हा रिफ्रेश रेट मोबाईल गेम खेळणाऱ्यांसाठी खूप चांगला ठरेल. डिव्हाइसमध्ये हाय ब्राइटनेस मोड देण्यात आला आहे, या फोनचा डिस्प्ले 800 निट्सपर्यंत अधिक ब्राईटनेस प्रदान करतो. Galaxy M32 मध्ये 48MP चा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाणार असून त्यामध्ये 6,000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा फोन अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर आणि सॅमसंग डॉट कॉम या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करता येईल. सॅमसंगचा Galaxy M42 भारतात लाँच झाल्यानंतर एक महिन्याने हा फोन भारतात दाखल होईल. हा कंपनीचा भारतातील पहिला मिड सेगमेंट 5G स्मार्टफोन असेल.
Galaxy M42 सॅमसंगच्या M सिरीजमधील पहिला 5G स्मार्टफोन आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 6.60 इंचांचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 6GB RAM देण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर बेस्ड OneUI 3.1 वर चालतो. यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, सोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
या फोनच्या रियर कॅमेर्याबद्दल सांगायचे झाल्यास यात 48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्या स्टोरेजबद्दल सांगायचे तर त्यात 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज स्पेस आहे, जी मायक्रोएसडी कार्डद्वारे 1000 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनची किंमत 21,999 रुपये इतकी आहे.
इतर बातम्या
दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?
(Galaxy M32 5G | cheapest Samsung 5G smartphone ready to launch in India)