Battlegrounds Mobile India गेम IOS डिव्हाइसवर कसा डाऊनलोड करणार?

| Updated on: Aug 20, 2021 | 7:26 PM

भारतातील iOS डिव्हाइस युजर्ससाठी नुकतीच एक आनंदाची बातमी मिळाली. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (Battlegrounds Mobile India) हा गेम अखेर बुधवारी (18 ऑगस्ट) iOS डिव्हाइससाठी लाँच झाला.

Battlegrounds Mobile India गेम IOS डिव्हाइसवर कसा डाऊनलोड करणार?
Pubg Battlegrounds Mobile India
Follow us on

मुंबई : भारतातील iOS डिव्हाइस युजर्ससाठी नुकतीच एक आनंदाची बातमी मिळाली. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (Battlegrounds Mobile India) हा गेम अखेर बुधवारी (18 ऑगस्ट) iOS डिव्हाइससाठी लाँच झाला. यावेळी क्राफ्टनने बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाचे फेसबुक पेजदेखील अपडेट केले आहे. क्राफ्टन ही दक्षिण कोरियाची गेमिंग फर्म आहे, ज्या कंपनीने बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम विकसित केला आहे. (How to Download Battlegrounds Mobile India on apple iOS Device, Download Link Here)

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया – ज्याला PUBG मोबाईल इंडियाची स्वदेशी आवृत्ती म्हणून ओळखले जाते हा गेम भारतात जुलैमध्ये अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी रिलीज करण्यात आला. दरम्यान, आता बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडियाची आयओएस आवृत्ती आयफोन आणि आयपॅडवरील अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. तुम्ही https://apps.apple.com/in/app/battlegrounds-mobile-india/id1526436837 या लिंकवरुन iOS वर Battlegrounds Mobile India डाउनलोड करू शकता.

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया आता अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा प्रसिद्ध गेम सध्या अ‍ॅप स्टोअरच्या डेस्कटॉप आवृत्तीवर सूचीबद्ध आहे, परंतु सध्या मोबाइलवर नाही.

अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी गेम आयओएस प्लॅटफॉर्मवर

अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी दोन महिन्यांनंतर हा गेम आयओएस प्लॅटफॉर्मवर आला आहे. हा गेम मे महिन्यात गुगल प्ले स्टोअरवर प्री-रजिस्ट्रेशनसाठी सज्ज होता, त्यानंतर तो 17 जून रोजी बीटामध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाला. यानंतर, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया 2 जुलै रोजी अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी अधिकृतपणे लाँच झाला. प्रत्येक वेळी, iOS वापरकर्त्यांना डेवलपरकडून अपडेटची प्रतीक्षा करावी लागत होती, जे प्लॅटफॉर्मवर गेमच्या आगामी रिलीझला टीज करीत होते आणि आता गेम iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

सर्व खेळाडूंना रोमांचक वेलकम रिवार्ड्स मिळतील

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, “नुकतेच सामील झालेल्या गेमच्या चाहत्यांसाठी अनेक बक्षिसांची प्रतीक्षा आहे. सुरुवातीपासूनच, सर्व खेळाडूंना रोमांचक वेलकम रिवार्ड्स मिळतील. रिकॉन मास्क, रिकॉन आउटफिट, सेलिब्रेशन एक्सपर्ट टायटल आणि 300AG जे एकाच वेळी रिडीम केले जाऊ शकतात. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया डाउनलोड करण्यासाठी, वापरकर्ते iOS दुव्यावर जाऊन GET बटणावर क्लिक करू शकतात.

प्ले स्टोअरवर 50 दशलक्ष डाउनलोड

एकदा आपण गेम सुरू केल्यानंतर आणि लॉग इन केल्यानंतर, इव्हेंट सेंटरमध्ये दावा करण्यासाठी बक्षिसे आपोआप उपलब्ध होतील. कंपनीने सांगितले की या आठवड्यात बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाने प्ले स्टोअरवर 50 दशलक्ष डाउनलोड केले आहेत. गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया मालिकेला आतापर्यंत 540,000 हून अधिक नोंदणीसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

जुलैमध्ये, कंपनीने आपली पहिली एस्पोर्ट्स टूर्नामेंट – बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया सिरीज 2021 ची घोषणा केली. 19 जुलैपासून स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. तीन महिन्यांत या कार्यक्रमाचे 5 टप्पे असतील. व्हिडिओ गेम डेव्हलपरने यासाठी 1 कोटी रुपयांचा बक्षीस पूल जाहीर केला आहे.

इतर बातम्या

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(How to Download Battlegrounds Mobile India on apple iOS Device, Download Link Here)