मुंबई : PUBG न्यू स्टेट (PUBG New State) मोबाईल गेम गुरुवारी लाँच करण्यात आला आणि एका दिवसात या बॅटल रॉयल गेमला Google Play Store वर एकूण 1 मिलियन म्हणजेच 10 लाखांहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत. अनेक युजर्सनी हा गेम प्री-रजिस्टर केला होता. ज्यामुळे अॅपला परवानगी देणार्या युजर्सच्या डिव्हाइसवर गेम ऑटो-डाउनलोड झाला. (PUBG: New State crosses 1 million downloads on first day)
सर्व्हरच्या समस्यांमुळे PUBG न्यू स्टेटचे सुरुवातीचे डाउनलोड बाधित झाले होते आणि क्रॅफ्टनने सकाळी 9:30 वाजेचा लाँचिंगच्या वेळेनंतर केवळ दोन तासांनंतर गेमसह लाईव्ह जाण्याचे ठरवले. डाउनलोडवरून असे सूचित होऊ शकते की गेम Google App Store वरील टॉप चार्टसाठी जात आहे. ही बातमी प्रसिद्ध करेपर्यंत PUBG न्यू स्टेट गेमला 3.8 स्टार रेटिंग मिळाले आहे. कनेक्टिव्हिटीसह सुरुवातीच्या अडचणी आणि नंतरच्या बग्स आणि ग्लिचेसने गेमर्सना बराच त्रास दिला आहे. क्राफ्टनने युजर एक्सपीरियन्स सुधारण्यासाठी बग आणि काही सुधारणांची यादी देखील जारी केली.
PUBG न्यू स्टेट गेम लाँच झाल्याच्या खूप नंतर हा गेम Apple App Store वर सूचीबद्ध करण्यात आला. iOS अॅप 1.5GB च्या डाउनलोड साईजसह येतो आणि केवळ iOS13 किंवा त्यानंतरच्या iPhones आणि iOS 13 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनवर चालणाऱ्या iPads शी कॉम्पॅटिबल (सुसंगत) आहे.
Crafton Studios ने Apple App Store वर 17+ आणि Android Play Store वर 16+ वयोमर्यादा ठेवली आहे. टेस्टिंग टप्प्यात, बॅटल रॉयल गेमसाठी रिस्ट्रिक्शन मर्यादा 12+ होती.
PUBG New State 2050 च्या टाइमलाइनवर आधारित आहे आणि यात PUBG मोबाइल किंवा BGMI पेक्षा चांगले ग्राफिक्स आणि गेम-प्ले आहे. या नवीन मोडमध्ये अनेक वाहने, ड्रोन आणि इतर गोष्टींना एलईडी लॅम्प बसवण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 4 मॅप्स देण्यात आले आहेत. नवीन गेममध्ये चांगले वेपन कस्टमायझेशन, नवीन वाहने, ड्रोन शॉप आणि इतर कंटेंट समाविष्ट करण्यात आला आहे.
Team Deathmatch Mode : यामध्ये नवीन स्टेशन मॅप पर्याय असेल. अनेक क्रेट्स आणि रखडलेल्या ट्रेनचे डब्बे आहेत. यामध्ये तुम्हाला गेम खेळायचे आहेत. हा मॅप फाईटसाठी आहे. यामध्ये दूरपर्यंत मारा करणाऱ्या रायफल्स क्वचितच पाहायला मिळतील. हा गेम केवळ 10 मिनिटे खेळता येतो. यामध्ये 40 किलिंग करणारा विजेता असेल.
गेल्या वर्षी PUBG मोबाईल गेमवर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर पबजी हा गेम या वर्षी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया या नावाने भारतात लाँच करण्यात आला. Android युजर्स Google Play Store वरून हे दोन्ही गेम डाउनलोड करू शकतील, तर iPhone वापरकर्त्यांना Apple App Store वर जावे लागेल
इतर बातम्या
48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…
(PUBG: New State crosses 1 million downloads on first day)