गुंतवणूकदारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडनं गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने पहिल्यांदाच प्रथमच बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे कारण आहे कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या तेजीनंतर कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठल्याचंही दिसून आलं.
कंपनीचा गुंतवणूकदारांसाठी मोठा निर्णय
त्यामुळे गुंतवणूकदारांना कंपनीने प्रत्येक शेअरमागे 4 बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. आज बीएसईवर कंपनीचा शेअर 4129.45 रुपयांवर खुला झाला. काही वेळानंतर कंपनीचा हाच शेअर 15 टक्क्यांहून अधिक वाढून तो 4567.80 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा हा 52 आठवड्यांतील नवा उच्चांक आहे. तर, बीएसईवर कंपनीचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 3116.10 रुपये प्रति शेअर आहे.
कंपनीने पहिल्यांदाच असा निर्णय घेतला आहे. दरम्यान पात्र गुंतवणूकदारांना 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरवर 4 नवे शेअर्स फ्री म्हणजे बोनस म्हणून दिले जाणारेत. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देत आहे. मात्र कंपनीनं बोनस शेअरची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही.
शेअरच्या किमती मागील तीन महिन्यांमध्ये वाढ
गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडच्या शेअरच्या किमती मागील तीन महिन्यांमध्ये 21.66 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर या शेअर्सने 6 महिन्यात गुंतवणूकदारांना 39 टक्क्यांहून अधिक नफा दिला आहे. गेल्या एका वर्षात 42 टक्के परतावा दिला आहे. या शेअरची किंमत 5 वर्षांत 288 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. सप्टेंबर महिन्यात कंपनीचा एक्स-डिव्हिडंड ट्रेड होता. त्यानंतर कंपनीने प्रति शेअर 3 रुपये अंतिम लाभांश दिला आहे.
कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना नक्कीच मोठं गिफ्ट मिळाल्यासारखं आहे. तसेच या घोषणेचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून येत आहे.नक्कीच शेअर्समध्ये वाढही झाल्याचे दिसून आले.
(ही शेअरर्सची माहिती फक्त गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. मात्र यामधून कोणताही गुंतवणूकीचा सल्ला देण्याचा हेतू नाही. या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करणे आवश्यक आहे.)