नवी दिल्ली : आयआरसीटीसी ग्राहकांना रेल्वेशी संबंधित सेवा पुरवण्याव्यतिरिक्त बर्याच इतर सेवा पुरवते, यात एअर तिकिट, बस तिकिटे आदिंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आयआरसीटीसीचे मोबाईल पेमेंट अॅप्लीकेशनही आहे. या अॅप्लीकेशनद्वारे तुम्ही शॉपिंगही करु शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता आणि एकमेकांना पैसेही पाठवूही शकता. अन्य अॅप्लीकेशनच्या तुलनेत या अॅप्लीकेशनवर अधिक ऑफर्स मिळतात. नुकतेच आयआरसीटीसीने एक ऑफर सुरु केली आहे, ज्यात तुम्ही 2 हजार रुपयापर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. तुम्हालाही याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटद्वारे घेऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे अॅप्लीकेशन कशाप्रकारे काम करते? आणि कसे तुम्ही हजार रुपये मिळवू शकता. (Get Rs 2,000 cashback on Rs 5,000 shopping on IRCTC app)
आयआरसीटीसीचे हे पे-मोबाईल अॅप्लिकेशन आहे, ज्याचे नाव आहे आय-मुद्रा. हे अॅप्लीकेशनमुळे केवळ सुलभ आणि सुरक्षित व्यवहारच होत नाही तर वापरकर्त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीसह मित्र आणि कुटुंबियांना पैसे पाठविण्याचा पर्याय देखील देते. आय-मुद्रा अकाऊंटसोबत डिजिटल वॉलेट आणि प्रीपेड कार्डही मिळते.
आयआरसीटीसी आय-मुद्रा अॅपच्या व्हिजा आणि रुपे कार्डद्वारे केलेल्या ट्रान्झॅक्शनवर 2 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर देत आहे. आय-मुद्रा अॅपच्या व्हिसा किंवा रुपे कार्डवर तुम्ही 5000 रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यास तुम्हाला 2000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते. आयआरसीटीसीकडून मिळणाऱ्या या विशेष ऑफरचा तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्ही आय-मुद्रा अॅपचा वापर करु शकता.
आय-मुद्रा अन्य पेमेंट अॅप्लीकेशनसारखेच आहे, ज्यात तुम्ही पेमेंट आणि शॉपिंग करु शकता. यासोबत एक फिजिकल कार्डही मिळते, ज्याद्वारे तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. यासह तुम्ही डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून या अॅप्लिकेशनच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकता. या वॉलेटमधून तुम्ही सहजरित्या तिकिट बुक करु शकता आणि पेमेंटही करु शकता. हे अॅप्लीकेशन तुम्ही प्ले स्टोरच्या माध्यमातून डाऊनलोड करु शकता.
आयआरसीटीसीने फेडरल बँकेच्या सहकार्याने हे कार्ड लाँच केले आहे. या कार्डमध्ये तुम्ही डेबिट कार्ड, युपीआय किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरु शकता. आयमुद्रा अकाऊंटसोबत डिजिटल वॉलेट आणि प्रीपेड कार्ड येत असल्याने या सुविधेमार्फत एटीएममधून पैसे काढू शकता. मात्र यासाठी आईआरसीटीसी मुद्रावर साईन-अप करणे आवश्यक असून युजरला फिजिकल किंवा वर्चुअल कार्ड जनरेट करावे लागेल. (Get Rs 2,000 cashback on Rs 5,000 shopping on IRCTC app)
बाबा रामदेवांच्या ‘कोरोनिल’ला मेडिकल असोसिएनशचा विरोध; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगला होता सोहळा https://t.co/Ct2gSAFvNe #BabaRamdev #coronavirus #PatanjaliCoronil
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2021
इतर बातम्या
मुकेश अंबानी बनवणार जगातलं सगळ्यात मोठं प्राणीसंग्रहालय, ‘या’ वर्षी होणार काम पूर्ण
कोरोनाचा धोका वाढल्यामुळे केंद्र सरकार अलर्ट; राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना