मुंबई : Email स्कॅम्स खूप वेगाने वाढत आहेत. हॅकर्स आणि फ्रॉडस्टर्स वापरकर्त्यांना नवीन पद्धतीने या घोटाळ्याचा बळी बनवत आहेत. ईमेलद्वारे, स्कॅमर्स वापरकर्त्यांना मॅलेशियस लिंकवर क्लिक करायला लावतात आणि नंतर त्यांची वैयक्तिक माहिती चोरतात. (Gmail, Outlook users hit by new email scams)
नुकत्याच समोर आलेल्या लेटेस्ट ईमेल घोटाळ्यात जीमेल आणि आउटलुक वापरकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. हे मेल सुपरमार्केटमधून आल्याचा दावा केलेला असतो आणि वापरकर्त्यांना लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले जाते. लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्ते पैसे, खासगी डेटा किंवा दोन्ही गमावू शकतात.
लोकप्रिय ईमेल सेवा जीमेल आणि आउटलुकच्या ग्राहकांना या ईमेलद्वारे लक्ष्य केले जात आहे. ईमेलमध्ये, ग्राहकांना बक्षिसांचे आमिष दाखवले जाते. यामध्ये असे म्हटले आहे की, या गिफ्ट कार्ड्सद्वारे ते स्टोअरमधून शॉपिंग करू शकतात. हे गिफ्ट कार्ड्स क्लेम करण्यासाठी, स्कॅमर्स वापरकर्त्यांना छोट्या सर्वेक्षणांमध्ये भाग घेण्यास सांगतात. किंवा युजर्सना त्यांची माहिती भरण्यास सांगितले जाते.
जे वापरकर्ते या लिंकवर क्लिक करतात त्यांना वेबसाइटवर नेले जाते. पण, सर्वेक्षणात सहभागी झाल्यानंतर माहिती भरल्यानंतर युजर्सच्या लक्षात येतं की, हा फेक मेल होता. युजर्सना या सर्वेक्षणातून काहीही मिळत नाही. याउलट युजर्स त्या सर्वेक्षणात सहभागी होऊन ते स्वतःचा डेटा गमावून बसतात. हॅकर्स त्यांचा डेटा चोरून किंवा थेट मिळवून युजर्सची फसवणूक करतात.
Express UK च्या मते, अशा प्रकारचा पहिला घोटाळा जूनमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाला. याद्वारे, स्कॅमर्स वापरकर्त्यांचे लॉगिन तपशील आणि इतर माहिती मिळवतात. हे टाळण्यासाठी, वापरकर्त्यांना कोणत्याही अज्ञात मेलमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करु नका असा सल्ला दिला गेला नाही.
या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना कोणत्याही अज्ञात अटॅचमेंट्स ओपन करु नका, असे सांगण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अज्ञान संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरु नका, खासगी तपशील शेअर करु नका असा सल्ललादेखील देण्यात आला आहे.
इतर बातम्या
5000mAh बॅटरी, 4 कॅमरे असलेल्या Samsung च्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात
OnePlus च्या शानदार स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
2500 रुपयांहून कमी किंमतीत 4G फोन, लिस्टमध्ये नोकियासह अनेक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध
(Gmail, Outlook users hit by new email scams)