नवी दिल्ली | 26 January 2024 : नवीन रस्त्यावरुन जाताना, नवीन शहराकडे, नवीन ठिकाणी जाताना आता गुगलचे नॅव्हिगेशन ऐप Google Maps चा जास्त उपयोग होतो. तसेही अनेक जण, आपलं तोंड का भांडलंय, असं म्हणतं विचारपूस करत निघातत. पण निर्मनुष्य रस्त्यावर जास्त कसरत होते. अशा वेळी गुगल मॅप उघडावे लागते. पण इंटरनेटने धोका दिला, तर ताप वाढतो. अशावेळी विना इंटरनेट सुद्धा तुम्हाला गुगल मॅप अचूक रस्ता शोधण्यासाठी मदत करते. हे सीक्रेट तुम्हाला माहिती नसेल तर या ट्रिक आणि टिप्सनेत तुम्ही अशा प्रकारे तुमचे इच्छित स्थळ गाठू शकता. काय आहे हा सोपा उपाय?
Offline Maps
तुम्ही गुगल मॅप लावून रस्त्यावरुन वाहन चालवत असाल आणि अचानक नेटवर्कची अडचण आली तर? मग काय तुम्हाला वाटेल या आडवळणी रस्त्यावर आता कोणाची वाट पाहत किती वेळ ताटकळायचं, नाही का. पण गुगल मॅपमध्ये एक सीक्रेट फीचर आहे. तुम्ही विना इंटरनेट सुद्धा हे फीचर उपयोगात आणू शकता. पण त्यासाठी हे काम इच्छितस्थळी निघणाऱ्यापूर्वी आठवणीने करावे लागणार आहे. तुम्हाला Google Maps मध्ये Offline Maps हे फीचर मिळते. हे फीचर विना इंटरनेट पण काम करते. हे फीचर कसे वापरात आणायचे हे पाहुयात..
Google Maps without Internet चा असा करा वापर