Pixel Smartwatch : गुगलच्या ‘या’ स्मार्टवॉचचे फोटो पाहिलेत का? लवकरच होणार लाँच

| Updated on: Apr 27, 2022 | 11:26 AM

गुगल पिक्सल स्मार्टवॉचशी संबंधित बरीच माहिती लिक झाली आहे. यावर आधारीत एका रिपोर्टनुसार, ही स्मार्टवॉच लवकरच लाँच होणार आहे.

Pixel Smartwatch : गुगलच्या ‘या’ स्मार्टवॉचचे फोटो पाहिलेत का? लवकरच होणार लाँच
स्मार्टवॉच
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : गुगलची (google) पिक्सल स्मार्टवॉच गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका रिपोर्टनुसार, गुगल लवकरच पिक्सलच्या नावाने आपली स्मार्टवॉच लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टवॉचची काही फोटोदेखील लिक झालेली आहेत. या स्मार्टवॉचमधील काही फिचर्स (features) ॲप्पलच्या स्मार्टवॉचसारखी असल्याचा दावा केला जात आहे. गुगल पिक्सल स्मार्टवॉचला (smartwatch) अमेरिकेच्या एका रेस्टोरेंटमध्ये पाहिले गेले आहे. ही लेटेस्ट स्मार्टवॉच आता पिक्सल टीममध्ये अंतिम चाचणीच्या टप्प्यात आहे. दरम्यान, अशा सगळ्या चर्चा सुरु असल्या तरी गुगलने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे ही स्मार्टवॉच कधी लाँच होणार याबाबत चर्चा सुरु आहेत.

कशी असेल डिझाईन

समोर आलेल्या स्मार्टवॉचच्या फोटोनुसार, पिक्सल स्मार्टवॉच मिनीमेलिस्टिक डिझाईनसह येणार आहे. अँड्रायडसेंट्रलतर्फे शेअर करण्यात आलेल्या फोटोनुसार, पिक्सल वॉचमध्ये ॲप्पल वॉचसारखी काही बटनेदेखील उपलब्ध होणार आहेत. यात स्मार्ट बँडदेखील बघायला मिळणार असून या वॉचमध्ये बेझेल मिळणार नसल्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुगल पिक्सल स्मार्टवॉचचा बँड अप्पलच्या स्पोर्टस्‌ वॉचसारखा दिसत आहे. पिक्सल स्मार्टवॉच चार्जरसोबत येणार नसल्याची माहिती आहे. स्मार्टवॉच चार्ज करण्याच्या प्रयत्नात असताना बूट लोगोमध्ये काहीही बदल झाले नसून, हे कुठलीही आपरेटींग सिस्टम नसल्यामुळे होण्याची शक्यता आहे.

केव्हा लाँच होणार

आतापर्यंत पिक्सल स्मार्टवॉचला रोहन या कोडनेमने ओळखले जात आहे. प्रसिध्द टिप्सटर इवान ब्लास यांच्या ट्वीटनुसार, पिक्स रोहनला लवकरच लाँच केले जाउ शकते. त्यासोबतच अजून एक टिप्सटर जॉन प्रोसर यांनी दावा केला आहे, की या स्मार्टवॉचला गुगल 2022 मध्येच लाँच करण्याच्या तयारीत आहे. गुगल पिक्सल स्मार्टवॉच नेक्सट जेन गुगल असिस्टसोबत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या स्मार्टवॉचमध्ये सॅमसंग एक्सीनोस चिपसेटचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच वापरकर्त्यांना स्मार्टवॉचमध्ये स्टेप काउंटर, कॅलरीज काउंटर, हार्ट रेट मॉनिटर, एसपीओ2 मोजने आदी आरोग्यविषयक फिचर्स मिळण्याची शक्यता आहे.