बाईक घेण्याचा विचार करतायेत? मग हा ऑपशन तुमच्यासाठी आहे सर्वात बेस्ट, टाकी फूल केली की धावते 700 किमी, किंमत पण खिशाला परवडणारी

| Updated on: Jan 02, 2025 | 4:21 PM

तुम्ही बाईक घेण्याचा विचार करताय का? मग आम्ही तुमच्यासाठी एक खास पर्याय आणला आहे. आम्ही Honda SP 125 बद्दल बोलणार आहोत, जे एकदा फुल टेक केल्यानंतर सुमारे 700 किमीचे अंतर पार करेल. फायनान्सवर खरेदी केल्यास किती EMI भरावा लागेल ते जाणून घेऊया.

बाईक घेण्याचा विचार करतायेत? मग हा ऑपशन तुमच्यासाठी आहे सर्वात बेस्ट, टाकी फूल केली की धावते 700 किमी, किंमत पण खिशाला परवडणारी
Follow us on

Honda SP 125 Price : बाईक घ्यायची पण पैसे कमी आहेत? मग चिंता कशाला करता. आम्ही तुम्हाला यावर एक खास पर्याय देत आहोत. Honda SP 125 हा तुमच्यासाठी खास पर्याय असू शकतो. एकदा फुल टेक केल्यानंतर सुमारे 700 किमीचे अंतर पार करेल. फायनान्सवर खरेदी केल्यास किती EMI भरावा लागेल. याविषयी पुढे वाचा.

तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फायनान्स प्लॅनचा आधार घेतला जाऊ शकतो. अनेक फायनान्स कंपन्या तुम्हाला EMI वर बाईक खरेदी करण्यास मदत करतात. अशीच एक बाईक आहे Honda SP 125, जी सिंगल फुल टँकवर सुमारे 720 किमी धावू शकते. चला तर मग जाणून घेऊया 5,000 रुपये डाउन पेमेंट करून ही बाईक कशी खरेदी करता येईल.

Honda SP 125 ची किंमत किती ?

Honda SP 125 दोन व्हेरियंटमध्ये येते, एक ड्रम आणि दुसरा डिस्क व्हर्जन. ड्रम व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 87,468 रुपये आहे, तर डिस्क व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 91,468 रुपये आहे. जर तुम्हाला ही बाईक (डिस्क व्हेरियंट) 5,000 रुपये डाउन पेमेंट देऊन मिळाली तर त्याची ऑन-रोड किंमत 1,01,768 रुपये आहे.

5,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर किती कर्ज?

Honda SP 125 ही ऑन-रोड किंमत दिल्लीसाठी आहे. आता ऑन-रोड किंमत 1,01,768 रुपये असेल आणि 5,000 रुपये डाउन पेमेंटमध्ये गेले तर 96,768 रुपये शिल्लक राहतील. फायनान्स कंपनी तुम्हाला 96,768 रुपयांचे कर्ज देईल. जर तुम्ही हे लोन 5 वर्षांसाठी घेतले असेल तर जाणून घेऊया किती EMI होईल.

5 वर्षांच्या कर्जावर किती EMI?

Honda च्या अधिकृत वेबसाईटवर EMI कॅल्क्युलेटर आहे. या कॅलक्युलेटरनुसार जर 10 टक्के व्याज दर असेल आणि 96,768 रुपयांचे कर्ज 5 वर्षांसाठी असेल तर 2,056 रुपये दरमहा EMI भरावा लागेल. 5 वर्षांनंतर एकूण 26,594 रुपये व्याज म्हणून जातील. या हिशोबानुसार तुम्ही ही बाईक EMI वर घेऊ शकता.

होंडाच्या डीलरशिपवर तुम्हाला फायनान्स ऑफर दिली जाऊ शकते. याशिवाय तुम्ही स्वत: फायनान्स कंपन्यांशीही संपर्क साधू शकता. फायनान्स कंपन्या त्यांच्या अटी आणि शर्तींच्या आधारे 5,000 रुपये डाउन पेमेंट आणि EMI सारख्या ऑफर देतात. नमूद केलेल्या फायनान्स ऑफरसह बाईक खरेदी करायची असेल तर या अटी आणि शर्तींची पूर्तता करावी लागेल.

फुल्ल टँकवर 720 किलोमीटर धावणार

Honda SP 125 मध्ये 123.94 सीसी इंजिन आणि 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. या बाईकची फ्यूल टँक क्षमता 11.2 लीटर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, होंडा एसपी 125 सुमारे 65 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. या आधारावर एकदा टँक भरल्यानंतर ही बाईक सुमारे 720 किमीचे अंतर कापू शकते.