आता चांगला फोटो काढायचा म्हणजे सर्वप्रथम स्मार्टफोनचा कॅमेरा स्वच्छ असणं आवश्यक आहे. तुम्ही अगदी ऐनवेळी फोटो काढायचा म्हणून कसाही कॅमेरा स्वच्छ केल्यास नुकसान होऊ शकते. धूळ, बोटांचे ठसे आणि इतर घाण कॅमेऱ्याची गुणवत्ता बिघडवू शकते. तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा सहज कसा स्वच्छ करता येईल, याविषयीच्या टिप्स जाणून घ्या. आजकाल स्मार्टफोनमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा कॅमेरा असतो. युजर्सची पसंती पाहून कंपन्या चांगला कॅमेरा असणारे फोन बाजारात आणतात. विशेष म्हणजे आता स्मार्टफोनचे कॅमेरा डीएसएलआर कॅमेऱ्यांशीही स्पर्धा करतात. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांना वेगवेगळ्या अँगलमधून फोटो काढायला आवडतात.
स्मार्टफोनमधून उत्तम फोटो काढण्यासाठी स्वच्छ कॅमेरा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या कॅमेऱ्यावर धूळ, बोटांचे ठसे आणि इतर घाण कॅमेऱ्याची गुणवत्ता बिघडवू शकते. अनेकदा फोनचा कॅमेरा साफ करताना लोक काही चुका करतात. यामुळे कॅमेऱ्याचं खूप नुकसान होतं. चला तर मग तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा सहज कसा स्वच्छ करता येईल, याविषयीच्या टिप्स पाहुया.
मायक्रोफायबर कापड: मायक्रोफायबर कापड हा उत्तम पर्याय आहे. हा कपडा मऊ आहे आणि लेन्स स्क्रॅच होण्याचा धोका यानं कमी होतो.
चष्मा साफ करणारं कापड: हा देखील एक चांगला पर्याय आहे. हवं असेल तर चष्मा साफ करण्यासाठीही कापडाचा वापर करू शकता.
लेन्स क्लीनर: कॅमेरा लेन्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लेन्स क्लीनरचा वापर करू शकता.
मायक्रोफायबर कापडाचा वापर करा: मायक्रोफायबर कापडाच्या हलक्या ओल्या रंगाने लेन्स हळुवारपणे पुसून घ्या. वर्तुळाकार गतीने लेन्स पुसून घ्या.
लेन्स क्लीनर वापरा: जर लेन्स खूप घाणेरडी असेल तर मायक्रोफायबरच्या कापडाला थोडा लेन्स क्लीनर लावून लेन्स साफ करू शकता.
लेन्स ब्रश: फोनच्या कॅमेऱ्यावर जमा झालेली धूळ दूर करण्यासाठी तुम्ही लेन्स ब्रशचा वापर करू शकता. हे खूप मऊ आहे. यामुळे लेन्सवर स्क्रॅच येत नाहीत.