Credit Card बंद करायचे? आधी ‘या’ गोष्टी समजून घ्या

| Updated on: Nov 20, 2024 | 8:22 PM

Credit Card बंद करायचं आहे का? हा तुमचा निर्णय आहे. तर त्यापूर्वी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर आधी त्याची सर्व थकबाकी भरा. पूर्ण थकबाकी भरल्याशिवाय क्रेडिट कार्ड बंद करता येत नाही. तसेच याविषयीचे इतर नियम जाणून घ्या.

Credit Card बंद करायचे? आधी ‘या’ गोष्टी समजून घ्या
Follow us on

तुम्ही Credit Card बंद करायच्या निर्णय घेतला असेल तर तुम्हाला त्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असायला हवी. आपण अनेकदा वाढत्या खर्चासारख्या कारणांमुळे कोणतेही निर्णय घेतो आणि याचा परिणाम आपल्याला भविष्यात सोसावा लागू शकतो. त्यामुळे खाली आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत, त्या काळजीपूर्वक वाचा.

अनेकदा आपल्याला Credit Card बंद करावे वाटते. Credit Card ने व्यवहार होत नसतानाही अनेक Credit Card वर शुल्क भरून लोक त्रस्त होतात. Credit Card बंद करून अनेकदा शुल्क आणि खर्च टाळता येतात.

तुम्हालाही Credit Card बंद करायचं असेल तर त्याआधी काही महत्त्वाचे कामं तुम्ही केले पाहिजे. यामुळे तुम्हाला नंतर कोणत्याही समस्येला सामोरे जावं लागणार नाही. तसेच तुमचं कोणतंही नुकसान देखील होणार नाही.

Credit Card ची बिले भरा

Credit Card बंद करायचं असेल तर आधी त्याची सर्व थकबाकी भरा. कारण जोपर्यंत तुम्ही पूर्ण पेमेंट करत नाही, तोपर्यंत केवळ काही रुपये थकबाकी असली तरी क्रेडिट कार्ड बंद करता येत नाही.

सूचना काढून टाका

अनेकदा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ओटीटी मासिक शुल्क, आवर्ती देयके, प्रीमियम भरणे असे अनेक खर्च लादते. त्यामुळे Credit Card बंद करण्यापूर्वी तुम्ही अशा कोणत्याही सूचना दिल्या नाहीत ना, हे तपासून घ्या. अन्यथा अशा परिस्थितीत तुम्हाला त्रास होऊ शकतो.

बक्षिसांचा लाभ घ्या

Credit Card बंद करण्याच्या घाईत रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम करायला विसरू नका. बिले किंवा इतर खर्च भरल्यानंतर मिळालेल्या रिवॉर्ड पॉईंट्सचा लाभ घ्या. त्यानंतरच Credit Card बंद करण्याची विनंती करा.

बँकांना कारणे समजावून सांगा

Credit Card बंद करण्यासाठी तुम्हाला बँकेला कळवावे लागेल. क्रेडिट कार्ड बंद करण्यामागचं कारणही तुम्हाला बँकेला सांगावं लागेल. तुम्हाला ईमेल किंवा Credit Card कापून त्याचा फोटो सबमिट करावा लागू शकतो.

Credit Card बंद करून कापायला विसरू नका

Credit Card बंद केल्यावर ते तिरक्या हाताने कापून घ्या. जेणेकरून त्यावर चिन्हांकित केलेले आकडे कापले जातील. तसे न केल्यास आणि Credit Card चुकीच्या हातात असेल तर त्याद्वारे फसवणूक होऊ शकते.

आपण अनेकदा वाढत्या खर्चासारख्या कारणांमुळे कोणतेही निर्णय घेतो आणि याचा परिणाम आपल्याला भविष्यात सोसावा लागू शकतो. त्यामुळे वरील माहिती तुम्हाला उपयोगात येऊ शकते.