फोन चार्ज करताना एक चूक करेल बॅटरी खराब, अशी घ्या काळजी

| Updated on: Oct 14, 2024 | 1:30 PM

Battery Charging Rule: स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ काम करत राहण्यासाठी ती योग्य प्रकारे चार्ज करणे खूप गरजेचे आहे. अयोग्य चार्जिंगमुळे बॅटरी खराब होऊ शकते. तसेच फोनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.

फोन चार्ज करताना एक चूक करेल बॅटरी खराब, अशी घ्या काळजी
Battery Charging Rule
Follow us on

Battery Charging Rule: स्मार्टफोन प्रत्येक घरात जितक्या व्यक्ती आहेत, त्यांच्यापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे आता घरात कधीकाळी असणारा लॅण्डलाईन फोन बंद झाला आहे. स्मार्टफोन वापरताना काही काळजी घेतल्यास त्याचे आयुष्य वाढू शकते. वारंवार फोन बदलण्याची गरज पडणार नाही. फोन वारण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे फोनला चार्जिंग करणे आहे. बॅटरी हा स्मार्टफोनच्या सेंसेटीव्ह पार्ट आहे. या बॅटरीमुळेच फोनला पॉवर मिळते. फोनमधील बॅटरी कमी असल्यास किंवा फोन पूर्ण डिस्चार्ज झाल्यास त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे फोन नियमित चार्ज करावा लागतो.

असे वाढवा बॅटरीचे आयुष्य

स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ काम करत राहण्यासाठी ती योग्य प्रकारे चार्ज करणे खूप गरजेचे आहे. अयोग्य चार्जिंगमुळे बॅटरी खराब होऊ शकते. तसेच फोनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. स्मार्टफोन चार्ज करण्याची योग्य पद्धत नेमकी कशी आहे पाहू या…

चार्जिंगसाठी या टीप्स वापरा

  1. ओरिजिनल चार्जरचा वापर करा. नेहमी आपल्यासोबत फोनचे ओरिजिनल चार्जर ठेवा. दुसरे चार्जर वापरल्यामुळे बॅटरीचे नुकसान होते.
  2. स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नका. जेव्हा बॅटरी 20% च्या खाली जाते, तेव्हा ती चार्ज करणे सुरू करा आणि 80% चार्ज झाल्यावर ती काढून टाका.
  3. एकदा फोन पूर्णपणे चार्ज झाला की चार्जरमधून काढून टाका. फोन चार्जरला जास्त वेळ जोडून ठेवल्याने बॅटरी खराब होऊ शकते.
  4. खूप गरम किंवा खूप थंड ठिकाणी स्मार्टफोन चार्ज करू नका. उष्णता किंवा थंडीमुळे बॅटरी खराब होऊ शकते.
  5. जलद चार्जिंग दीर्घकाळासाठी बॅटरीचे नुकसान करू शकते. म्हणून, ते जपून वापरा.
  6. अनेक स्मार्टफोन्समध्ये बॅटरी सेव्हर मोडची सुविधा असते. हा मोड चालू करून तुम्ही बॅटरीचे आयुष्य वाढवू शकता.
  7. स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये काही बॅटरीशी संबंधित सेटिंग्ज आहेत. जसे की ऑटो-ब्राइटनेस, लो-पॉवर मोड. या सेटिंग्ज योग्यरित्या सेट करून तुम्ही बॅटरीचे आयुष्य सुधारू शकता.