मोबाईलमधल्या स्लो इंटरनेटमुळे वैतागलाय? मग ‘हे’ उपाय करुन पाहाच!

| Updated on: May 20, 2021 | 11:46 PM

सिम 4 जी असेल तरीही, तुम्हाला वेगवान इंटरनेट किंवा उत्कृष्ट डेटा स्पीड मिळत नसेल, तर मोबाईल, ब्राऊझरशी संबंधित या सेटिंग्ज बदलून पाहा.

मोबाईलमधल्या स्लो इंटरनेटमुळे वैतागलाय? मग हे उपाय करुन पाहाच!
Mobile Internet
Follow us on

मुंबई : भारतात आता जवळपास सर्वच भागात 4G इंटरनेट पोहोचलं आहे. देशात 5G इंटरनेटच्या चाचण्या सुरु आहेत. तरी देशात अजूनही 3G आणि 2G सेवादेखील सुरु आहेत. परंतु देशात 4G चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता प्रत्येकाकडे 4G इंटरनेट वापरता येईल असे स्मार्टफोन्स आणि त्यास अनुकूल अशी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. तरीदेखील अनेकजण स्लो इंटरनेटमुळे वैतागलेले पाहायला मिळतात. अनेकदा आपण मोबाईलमधल्या स्लो इंटरनेटमुळे वैतागतो. आपल्या फोनमध्ये नेटवर्क पूर्ण असतं, तरीदेखील इंटरनेट स्पीड हवं तसं मिळत नाही. (How to Increase Mobile Internet Speed)

आपलं सिम 4 जी असेल तरीही, आपल्याला वेगवान इंटरनेट किंवा उत्कृष्ट डेटा स्पीड मिळत नसेल. तथापि, वेगवान इंटरनेट स्पीड मिळविण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाइल सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल किंवा व्होडाफोन-आयडिया (व्ही) चे सब्सक्रायबर्स हे सहजपणे करू शकतात.

मोबाईलच्या सेटिंग्ज

  • मोबाईलचे सॉफ्टवेअर अप टू डेट आहे का? याची खात्री करा.
  • मोबाईल खरोखरच आपल्याला अपेक्षित असलेला इंटरनेट स्पीड देऊन शकतो तरी का ते पहा. उदा. मोबाईल प्रोसेसर आणि रॅम
  • मोबाईल रॅम क्लीन करत रहा.
  • व्हिपीएन सर्व्हिस तात्पुरती बंद करा
  • मोबाईलचे नोटीफीकेशन्स बंद करुन टाका.

सिम कार्डशी संबंधित सेटिंग्ज

  • आपल्या भागात चौकशी करुन पाहा की कोणत्या कंपनीच्या सिमकार्डला चांगलं नेटवर्क आणि जास्तीत जास्त इंटरनेट स्पीड आहे. तुम्हीही त्या कंपनीचे सीमकार्ड घ्या. नवं सिमकार्ड घेणं शक्य नेसल तर सध्या वापरात असलेले सिमकार्ड त्या कंपनीमध्ये पोर्ट करुन घ्या.
  • सध्या तुम्ही वापरत असलेले सिमकार्ड 4 जी अपग्रेड आहे का पाहा. सिमकार्ड 3 जी असेल तर उगाच त्यावर 4 जी चालवण्याचा आततायीपणा करु नका.

वायफाय राऊटर वापरत असाल तर त्यासंबंधित सेटिंग्स

  • वाय फाय मोड – AX<A<N<B<G
  • मॅक्झिमम डिव्हाईस कनेक्ट – 1 ते 2 च ठेवा.
  • फ्रिक्वेंसी चॅनेल काहीतरी एकच निश्चीत करुन ठेवा. थोडक्यात ऑटो मोड वर टेवू नका.
  • वाय फाय वापरत असाल तर वायफाय कोणकोणत्या गोष्टींकरता वापरता, हे ठरवता येतं, त्याचा उपयोग करा.
  • शक्यतो एकावेळी एकच गोष्ट वापरण्यावर भर द्या. एकाचवेळी व्हॉट्सॲप कॉलिंग, पबजी, इंटरनेट ब्राऊझर ई. गोष्टी वापरु नका.

ब्राऊझरशी संबंधित सेटिंग्ज

  • ब्राऊझरमध्ये प्रायव्हेट मोड वापरु नका.
  • ब्राऊझरमध्ये गरज नसेल तेव्हा ‘ईमेज डाऊनलोड’ हा पर्याय बंद करुन ठेवा. उदा. क्रोम ब्राऊझर.
  • ब्राऊझरमध्ये व्हॉईस कमांडद्वारे ईनपुट देत बसण्यापेक्षा बोटांनी टाईप करण्याचा प्रयत्न करा.
  • युट्यूबवर व्हिडीओ पाहताना केवळ आवाज ऐकणे आवश्यक असेल तर व्हिडीओचे रिझॉल्युशन कमीत कमी ठेवा. रिझॉल्युशन आवश्यक असेल तर जास्तीत जास्त एचडी म्हणजे 720p टेवत जा.
  • तुम्ही ज्या वेबसाईट्स दररोज वापरता, त्या वेबसाईट्स फेव्हरेटमध्ये ॲड करुन टेवत जा.

व्हिपीएन सर्व्हिस (VPN service)

  • शक्यतो पेड म्हणजे दर महिन्याला शुल्क द्यावे लागेल अशी सर्व्हिस वापरा.
  • व्हर्चुअल सर्व्हर निवडताना तो जास्तीत जास्त जवळच्या देशातील असेल याची काळजी घ्या.
  • ज्या सर्व्हरवर कमीतकमी इंटरनेट लोड असेल असा सर्व्हर निवडा. सर्व्हर लोड 40% ते 55% असेल याची काळजी घ्या.
  • जर तुम्हाला मोठ्या फाईल्स, चित्रपट डाऊनलोड करायचे असतील तर रात्री 11:30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेटचा वापर करा. या वेळेत इंटरनेट स्पीड सर्वात जास्त असतो.

संबंधित बातम्या

PHOTOS : 5G आल्यानं तुमचं आयुष्य बदलून जाणार, केवळ फोनच नाही तर यावरही परिणाम होणार

दुप्पट पैसे घ्या पण वेगवान इंटरनेट द्या! 5G वापरण्यासाठी भारतीय उत्सुक

5G म्हणजे काय? भारतात कधी सुरु होणार? तुम्हाला कोणते फायदे मिळणार? जाणून घ्या सर्वकाही

(How to Increase Mobile Internet Speed)