तुम्ही फोन हॅकबद्दल अनेकदा ऐकलं असेल. पण, तुमचा फोन हॅक झाल्यास तुम्ही काय कराल, याविषयची तुम्हाला माहिती आहे का, नसेत तर चिंता करू नका. यावर आम्ही आज माहिती देणार आहोत. सायबर हॅकर्स तुमच्या फोनमध्ये घुसून तुमची खासगी माहिती चोरू शकतात, तुमच्या बँक खात्यात प्रवेश करू शकतात आणि तुमची हेरगिरी करण्यासाठी तुमच्या फोनचा वापर करू शकतात. पण, चिंता करू नका. यावरचा उपायही आम्ही खाली सांगणार आहोत.
तुम्हाला माहित आहे का की फक्त एका छोट्या ‘लाईट’मुळे तुम्हाला फोन हॅक झाल्याची माहिती मिळेल. अशाच पद्धतींबद्दल आम्ही आज माहिती देणार आहोत. तुम्ही स्मार्टफोन वापरता पण तुमचा स्मार्टफोन हॅक झाला आहे की नाही हे कसं कळणार? हे जाणून घेण्याचे काही सोपे मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या फोनची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी तपासू शकता. जाणून घ्या.
असे होऊ शकते की एखाद्या हॅकरने आपल्या फोनमध्ये स्पायवेअर टाकले असेल, जेणेकरून तो आपल्या फोनचा कॅमेरा वापरून आपली हेरगिरी करत असेल.
तुमचा फोन हॅक झाला आहे असं वाटत असेल तर लगेच त्याचा पासवर्ड बदला. याशिवाय तुम्हाला दिसणारे सर्व विचित्र आणि अनोळखी अॅप्स अनइन्स्टॉल करा. यानंतर फोन रिसेट केला.