फोन चोरीला गेल्यानंतर फोनचे लोकेशन ट्रॅक करता येऊ नये म्हणून चोरटे लगेच सिम काढून फेकून देतात. अशावेळी सिम काढल्यास फाइंड माय डिव्हाइसचा पर्याय अॅक्टिव्ह झाल्यानंतरही फोन ट्रॅक करता येत नाही. मात्र या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गुगलने आता फाइंड माय डिव्हाइस फीचर अपडेट केले आहे, ज्यामध्ये तुम्ही आता सिम कार्ड आणि इंटरनेटच्या कनेक्शनशिवाय तुमचा हरवलेला फोन ट्रॅक करू शकता.
फाइंड माय डिव्हाइसचे अपडेटेड व्हर्जन सर्व नवीन अँड्रॉइड स्मार्टफोनवर उपलब्ध करण्यात आले आहे. जर तुम्हाला या फीचर्सचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम ताबडतोब अपडेट करा. या नव्या फीचर्सच्या मदतीने युजर्स सिमकार्ड आणि अॅक्टिव्ह इंटरनेट कनेक्शनशिवाय सुद्धा हरवलेला फोन, टॅब्लेट, हेडफोन यासारख्या अँड्रॉइड डिव्हाइसेसचा शोध घेऊ शकतात. आता तुम्ही हे कसे करू शकता ते जाणून घेऊया.
फाइंड माय डिव्हाइसच्या मदतीने आता ऑफलाइन डिव्हाइस सर्च करता येणार आहेत. यासाठी तुमचा डिव्हाइस हा फाइंड माय डिव्हाइस नेटवर्कमध्ये कनेक्ट करणे आवश्यक असेल. एकदा डिव्हाइस कनेक्ट केल्यावर तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसच्या माध्यमातून हरवलेल्या डिव्हाइसचा गुगल अकाऊंट ओपन करून सर्च करू शकता. आता माय डिव्हाइस नेटवर्क शोधण्यासाठी डिव्हाइस जोडण्याची आणि डिव्हाइस शोधण्याची संपूर्ण प्रक्रिया येथे जाणून घेऊयात.
– फोनवर Find My Device app उघडा आणि गुगल अकाऊंटसह साइन इन करा.
– स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा.
– आता Find My Device Settings वर जाऊन टॅप करा.
– आता Find Your Offline Device वर टॅप करा.
– आता th network in all areas सिलेक्ट करा.
– सर्वप्रथम तुमच्या दुसऱ्या फोनमध्ये गुगल अकाऊंटसह साइन इन करून Find My Device app ओपन करा.
– आता तुम्हाला जे डिव्हाइस सर्च करायचे आहे ते स्क्रीनवर सिलेक्ट करावे लागेल.
– आता ‘Find nearby’ दिसेल, त्यावर टॅप करा.
– आता तुमच्या समोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल जी तुम्हाला हरवलेल्या डिव्हाइसची माहिती देईल.
– यात तुम्ही जस जसे डिव्हाइसजवळ गेल्यावर स्क्रीनवर दिसणाऱ्या गोल रिंग ही लाल रंगाने भरून जाईल.
– डिव्हाइस जवळ असेल तर तुम्ही अॅपच्या मदतीने डिव्हाइसचे लोकेशनही माहित करून घेऊ शकता.