मुंबई : इन्फिनिक्स (Infinix) ही स्मार्टफोन निर्माती कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपला 5G स्मार्टफोन लॉन्च करू शकते. हे ब्रँडचे पहिले 5G डिव्हाइस असेल. कंपनीने त्यांचा आगामी 5G स्मार्टफोन इन्फिनिक्स झिरो 5जी (Infinix Zero 5G) बाबत टीझ करण्यास सुरुवात केली आहे. इन्फिनिक्स इंडियाचे (Infinix India) सीईओ अनिश कपूर यांनी गेल्या महिन्यात पुष्टी केली की कंपनी त्यांच्या पहिल्या 5G-सपोर्टेड स्मार्टफोनवर काम करत आहे, जो Infinix Zero 5G नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.
काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, MediaTek Dimensity 900 प्रोसेसर Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये मिळू शकतो. हँडसेट Uni-curve आणि हाय रिफ्रेश रेट स्क्रीनसह येईल. यामध्ये 120Hz चा रिफ्रेश दर मिळू शकतो. हा हँडसेट ब्लॅक आणि ऑरेंज या दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. लीक झालेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर त्यात लेदर फिनिशिंग असलेले बॅक पॅनल मिळू शकते. पॉवर बटण फोनच्या उजव्या बाजूला असेल, ज्यामध्ये फिंगरप्रिंट सेंसर असेल. म्हणजेच, डिव्हाइसमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असेल. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, जो दोन एलईडी फ्लॅश युनिट्ससह येईल.
आतापर्यंतच्या लीक्सनुसार, फोनमध्ये 6.67-इंचांची AMOLED FHD + 120Hz स्क्रीन मिळेल, जी 1080 x 2460 पिक्सेल रिझोल्यूशनसह येईल. स्मार्टफोनला पंच होल कटआउट मिळेल, ज्यामध्ये 16MP सेल्फी कॅमेरा असेल. यासोबतच हँडसेटमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश लाइटही उपलब्ध असेल.
From zero everything came and into zero everything merges. Get ready to witness zero in an all new avatar. #ComingSoon pic.twitter.com/6ndGCdFehW
— InfinixIndia (@InfinixIndia) January 30, 2022
व्हॉल्यूम रॉकर डाव्या बाजूला दिला जाऊ शकतो. हे डिव्हाईस Android 11 वर आधारित XOS वर काम करेल. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्याची मुख्य लेन्स 48MP ची असेल, याशिवाय अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि टेलिफोटो सेन्सर फोनमध्ये मिळू शकतो. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी, 5000mAh क्षमतेची बॅटरी असेल, जी 33W चार्जिंगला सपोर्ट करेल.
इतर बातम्या
11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स