Google Down | 45 मिनिटं गुगलच्या सेवा ठप्प, जगभरात हाहाकार, वाचा जीवनावश्यक ठरलेल्या ‘Google’चा इतिहास!

| Updated on: Dec 14, 2020 | 6:55 PM

खाणे, पिणे, झोपणे, वाचणे इथपासून ते अगदी  जीवन जगण्यापर्यंत Google आपल्याला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत आहे.

Google Down | 45 मिनिटं गुगलच्या सेवा ठप्प, जगभरात हाहाकार, वाचा जीवनावश्यक ठरलेल्या ‘Google’चा इतिहास!
आता आपली गूगल हिस्ट्री राहणार सुरक्षित
Follow us on

मुंबई : आजच्या घडीला ‘गुगल’ (Google) आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. खाणे, पिणे, झोपणे, वाचणे इथपासून ते अगदी  जीवन जगण्यापर्यंत Google आपल्याला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत आहे. इतकेच काय तर आपल्याला कुठेतरी बाहेर जायचे असेल आणि रस्ता माहित नसेल तर, त्वरीत ‘Google’ मदतीला येतो. मोबाईलवर लगेच गुगल करून आपण मार्ग शोधून, इच्छित ठिकाणी पोहचता येते. गुगलच्या सेवा काही वेळासाठी बंद पडल्या तर, संपूर्ण जगभरात हाहाकार माजला होता (Interesting Story of Google and Who kept the name).

आपल्याला गुगलची इतकी सवय आहे की, कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, तर त्वरित Googleवर कोणते विद्यापीठ किंवा संस्था सर्वोत्तम हे शोधले जाते. नवे नाते जोडण्यापासून ते हृदय तुटण्यापर्यंतच्या वेदनांचे सर्व प्रकारचे कोट गुगलवर शोधले जातात. Google आता आपल्या आनंद आणि दु:खाचा साथीदार बनला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आजच्या काळात लोक पूर्णपणे गुगलवर अवलंबून आहेत.

सुमारे 20 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यावेळी इंटरनेट निश्चितच होते, मात्र प्रचार-प्रसाराचे प्रगत साधन नव्हते. परंतु, आजच्या काळात गुगल प्रसिद्धीचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे. तर चला, जीवनावश्यक ठरलेल्या ‘गुगल’चा इतिहास….

गुगल म्हणजे काय?

गुगल ही खूप मोठी टेक कंपनी आहे. सर्च इंजिन व्यतिरिक्त, क्लाउड कम्प्यूटिंग आणि इंटरनेट अॅनालिटिक्स या सेवादेखील गुगलद्वारे पुरवल्या जातात. आपण या सेवा गुगल ड्राइव्ह, जाहिरात, प्ले स्टोअरद्वारे वापरू शकतो (ज्याद्वारे कोणतेही अॅप्लिकेशन डाउनलोड केले जाऊ शकते). या सर्व व्यतिरिक्त गुगलचे स्वतःचे ब्राउझर देखील आहे, ज्याला गुगल क्रोम असे म्हणतात (Interesting Story of Google and Who kept the name).

या सेवांव्यतिरिक्त, गुगलकडे स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम देखील आहे. मॅप, ई-मेलसह गुगलची जगभरात 20 पेक्षा जास्त उत्पादने आहेत. आता गुगलने मोबाईल उद्योगातही प्रवेश केला आहे. 2016मध्ये गुगलने आपला मोबाइल लाँच केला, ज्याला ‘गुगल पिक्सल’ असे नाव देण्यात आले. या मोबाईलला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

कशी आणि कोणी केली गुगलची स्थापना?

गुगलचा शोध सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी लावला होता. त्यावेळी ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत होते. ‘गुगल’ हा त्यांचा थीसिस प्रोजेक्ट होता, ज्यावर हे दोघेही त्यांच्या पीएचडीचा अभ्यास करत होते. 1995मध्ये त्यांनी ‘गुगल’वर संशोधन केले आणि 1996 मध्ये ते अधिकृतपणे सुरू केले. परंतु, त्यावेळी हे नाव ‘गुगल’ असे नव्हते. संशोधनादरम्यान, त्यांनी केवळ सर्च इंजिन म्हटले आणि नंतर त्याचे नामकरण ‘BACKRUB’  असे करण्यात आले. अखेर 1997मध्ये त्याला अधिकृतपणे ‘Google’ हे नाव देण्यात आले (Interesting Story of Google and Who kept the name).

‘Google’ नावामागची कथा…

गुगलच्या नावामागे एक कथा देखील आहे. वास्तविक, दोघांच्या नावे ठेवण्याच्या धडपडीत, एक चुकीचा शब्द लिहिला गेला, जो होता Gogol. दोघांनाही ‘Googol’ लिहायचे होते, पण गडबडीत त्यांनी ‘Gogol’ लिहिले. ‘Googol’ हा एक गणितातील शब्द आहे. चुकीचा शब्द लिहिल्यामुळे अखेर ‘Google’  हे नाव त्याला देण्यात आले. यानंतर, गुगल दरवर्षी सातत्याने काहीतरी नवीन गुंतवणूक करत राहिला आणि आपल्या वापरकर्त्यांना उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहिला.

(Interesting Story of Google and Who kept the name)