जगभरातील ग्राहकांना Made in India Iphone 13 मिळणार, चेन्नईत ट्रायल प्रोडक्शन सुरु

| Updated on: Dec 21, 2021 | 5:36 PM

Apple लवकरच "मेड इन इंडिया" iPhone 13 सादर करणार आहे, यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. चेन्नईजवळील फॉक्सकॉन प्लांटमध्ये iPhone 13 सिरीजचं ट्रायल प्रोडक्शन सुरू झाले आहे.

जगभरातील ग्राहकांना Made in India Iphone 13 मिळणार, चेन्नईत ट्रायल प्रोडक्शन सुरु
IPhone 13
Follow us on

मुंबई : Apple लवकरच “मेड इन इंडिया” iPhone 13 सादर करणार आहे, यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. चेन्नईजवळील फॉक्सकॉन प्लांटमध्ये iPhone 13 सिरीजचं ट्रायल प्रोडक्शन सुरू झाले आहे. क्युपर्टिनो-जायंट भारतात आयफोन 13 चे कमर्शियल प्रोडक्शन सुरू करेल अशी अपेक्षा आहे. हे iPhones 2022 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होतील. (IPhone 13 to be made in India, trial production starts in Foxconn plant Chennai)

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अॅपलला त्यांचे सर्व टॉप-सेलिंग स्मार्टफोन मॉडेल्स भारतात बनवायचे आहेत. Apple फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारपेठेसाठी तसेच निर्यातीसाठी iPhone 13 चे उत्पादन सुरू करेल. पुरवठ्याचा आभाव असूनही Apple ने सेमीकंडक्टर चिप्स साठवल्या असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. Apple ने विकत घेतलेल्या सेमीकंडक्टर चिप्सचा जगभरात तुटवडा आहे.

ET च्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतात आयफोन 13 चे उत्पादन Apple ला त्यांच्या जागतिक बाजारपेठेत मॉडेलचा पुरवठा सुधारण्यास मदत करेल. विशेष म्हणजे, Apple आधीच भारतातील Foxconn Play येथे iPhone 11 आणि iPhone 12 आणि बंगळुरुतील विस्ट्रॉन प्लांटमध्ये सेकेंड जनरेशन iPhone SE चे उत्पादन करत आहे. अहवालानुसार, भारतात विकल्या जाणार्‍या स्मार्टफोनपैकी 70 टक्के स्मार्टफोन अॅपलचे आहेत, ज्यात iPhone XR, iPhone 11, iPhone 12, iPhone XR आणि iPhone SE यासह सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल समाविष्ट आहेत आणि लवकरच सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या यादीत आयफोन 13 चा समावेश होईल.

iPhone 13 सिरीजचे स्पेसिफिकेशन्स

नवीन आयफोन मागील मॉडेल आयफोन 12 पासून इन्स्पायर्ड आहे. यात नवीन A15 बायोनिक चिप, रिडिजाइन केलेले कॅमेरा मॉड्यूल आणि 120Hz रिफ्रेश रेटसह दमदार डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन 13 सिरीज एक वाईड नॉच, IP68 रेटिंग, मेटल-ग्लास बॉडी आणि फेस आयडी बायोमेट्रिक सिस्टम सह येतो.

मिनी व्हेरियंटमध्ये 5.4-इंच फुल एचडी+ (1080 × 2340 पिक्सल) ओएलईडी स्क्रीन आहे, तर आयफोन 13 आणि 13 प्रो मध्ये 6.1-इंच फुल एचडी+ (1170 × 2532 पिक्सल) ओएलईडी डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 120Hz, 6.7-इंच फुल-एचडी+ (1284 × 2778 पिक्सेल) OLED पॅनल आहे.

आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 मध्ये 12MP प्रायमरी सेन्सर आहे आणि रियर कॅमेरा 12 एमपीच्या अल्ट्रा-वाइड लेन्ससह आहे. दोन्ही प्रो मॉडेल मागील बाजूस ट्रिपल कॅमेरासह येतात.

iPhone 13 सिरीजची भारतातील किंमत

अलीकडेच लॉन्च झालेला आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीची किंमत अनुक्रमे 79,900 आणि 69,900 रुपयांपासून सुरू होते. या किंमती बेस स्टोरेज मॉडेलसाठी 128GB आहेत. आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स अनुक्रमे 1,19,900 आणि 1,29,900 रुपयांना उपलब्ध असतील.

इतर बातम्या

iPhone 13 सिरीजवर 20000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?

Xiaomi 12 या महिन्यात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ऑनलाईन फूड ऑर्डर करताय? 1 जानेवारीपासून द्यावा लागणार टॅक्स

(IPhone 13 to be made in India, trial production starts in Foxconn plant Chennai)