मुंबई : Apple पुढील वर्षी आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्यात 5G सपोर्ट असेल. ही iPhone 14 सिरीज नसून iPhone SE Plus असेल. एका टिपस्टरचा हवाला देत गिझ्नोचायनाच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. याआधी रिपोर्टमध्ये समोर आले होते की, कंपनी पुढील वर्षी iPhone SE 3 लॉन्च करेल, पण आता या फोनचे लॉन्चिंग काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. कंपनीने याआधी iPhone SE (2020) लॉन्च केला होता, ज्याला यूजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. (IPhone SE Plus with 5G coming in 2022)
iPhone SE सिरीज Apple ची एक परवडणारी आणि लहान-स्क्रीन फोन सिरीज आहे. या सीरीज अंतर्गत, आयफोन पहिल्यांदा 2016 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण सीरिजचा दुसरा फोन गेल्या वर्षीपर्यंत लॉन्च झाला नव्हता आणि त्याचे अपग्रेड व्हेरिएंट 2021 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता होती.
क्यूपर्टिनो आधारित टेक जायंट Apple 2022 मध्ये एलसीडी डिस्प्ले, अपग्रेडेड कनेक्टिव्हिटी आणि इंटर्नलसह नवीन आयफोन एसई मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखत आहे. GSMArena च्या अहवालानुसार, नवीन फोनमध्ये एक नवीन चिपसेट असेल जो 5nm A15 Bionic सह 5G नेटवर्कला सपोर्ट करेल. चीन आणि जगभरातील iPhone SE (2020) प्रमाणेच या फोनची किंमत 399 डॉलर्स असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फॉर्म फॅक्टरच्या अपेक्षा असूनही, नवीन डिव्हाइस iPhone XR डिझाइनवर आधारित असेल. Apple iPhone SE3 मध्ये iPhone SE 2020 मध्ये पाहायला मिळालेली 4G ऐवजी 5G कनेक्टिव्हिटी असेल. अपग्रेडेड इंटर्नलसह स्मार्टफोन अधिक चांगल्या परफॉर्मन्ससह येण्याची अपेक्षा आहे. आगामी iPhone मध्ये खाली आणि वरच्या बाजूला बेझल्ससह 4.7-इंच LCD, अॅल्युमिनियम बॉडीमध्ये टच-आयडी सेन्सर/होम बटण असण्याची अपेक्षा आहे.
SE3 चे उत्पादन डिसेंबर 2021 च्या आसपास सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. iPhone SE (2020) Apple च्या A13 बायोनिक चिपसेटद्वारे थर्ड जनरेशन न्युरल इंजिनसह ए13 बायोनिक चिपसेटद्वारे ऑपरेटेड आहे. यामध्ये मागच्या बाजूला दोन कॅमेरे दिली जातील, तर सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश
दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय
Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?
(IPhone SE Plus with 5G coming in 2022)