iQOO 13 स्मार्टफोन ‘या’ दिवशी लॉन्च होणार; जाणून घ्या फीचर्स, किंमत सर्वकाही…

| Updated on: Nov 11, 2024 | 3:02 PM

स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय का? मग ही बातमी वाचा. iQOO 13 भारतात 3 डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहे. Amazon India वर या हेडसेटसंदर्भात एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. येथून काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. चला जाणून घेऊया त्याबद्दल.

iQOO 13 स्मार्टफोन ‘या’ दिवशी लॉन्च होणार; जाणून घ्या फीचर्स, किंमत सर्वकाही...
Follow us on

iQOO 13 Launch : बाजारात नेहमीच नवनवीन स्मार्टफोन येत असतात. आता लवकरच iQOO चा नवीन स्मार्टफोन बाजारात येणार आहे. iQOO 13 हा हँडसेट 3 डिसेंबर 2024 रोजी भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. ही माहिती कंपनीने एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. iQOO ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, ते आपला पुढील फ्लॅगशिप हँडसेट भारतात आणत आहेत.

हँडसेटची माहिती कुठे?

iQOO 13 च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ते BMW मोटरस्पोर्टपासून प्रेरित आहे. यासंदर्भात अ‍ॅमेझॉन इंडियाने एक मायक्रोसाईटही तयार केली आहे. जिथे या हँडसेटची माहिती पाहायला मिळते.

Amazon लिस्टिंगनुसार, iQOO 13 स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट भारतात दाखल होणार आहे. स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह भारतात लॉन्च होणारा हा दुसरा हँडसेट असेल. याआधी रियलमी 26 नोव्हेंबरला भारतात एक हँडसेट लॉन्च करणार आहे.

डिस्प्लेबाबत कसा असणार?

कंपनीचा दावा आहे की, हा फोन Q10 2K 144Hz अल्ट्रा आयकेअर डिस्प्ले असलेला जगातील पहिला हँडसेट असेल. त्याच्या मदतीने युजर्सला उत्तम गेमिंगचा अनुभव पाहायला मिळणार आहे.

iQOO 13 ची अपेक्षित किंमत किती?

iQOO 13 ची किंमत भारतात iQOO 12 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. भारतात iQOO 12 ची सुरुवातीची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली होती. यात लेटेस्ट प्रोसेसर आणि अनेक हार्डवेअर पाहायला मिळाले. यात अ‍ॅडव्हान्स एआय फीचर पाहायला मिळते.

iQOO 13 स्पेसिफिकेशन्स

iQOO 13 चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, जिथे या हँडसेटमध्ये 6.82 इंचाचा डिस्प्ले आहे. यात 144Hz रिफ्रेश रेट मिळेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात इनहाऊस Q2 गेमिंग चिप देखील देण्यात आली आहे.

iQOO 13 चा कॅमेरा सेटअप

iQOO 13 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी कॅमेरा 50 एमपी सोनी आयएमएक्स 921 सेन्सर आहे. यात 50 एमपी सॅमसंग S5KJN1 चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. तिसरा कॅमेरा लेन्स 50 एमपी सोनी आयएमएक्स 816 टेलिफोटो आहे. यात 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

iQOO इंडियाचे सीईओ निपुण मारिया यांनी एक्स अकाऊंटवरून स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख सांगितली आहे. कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन 3 डिसेंबर 2024 रोजी भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे.

स्मार्टफोनची मायक्रो वेबसाईट लाईव्ह

लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर स्मार्टफोनची मायक्रो वेबसाईट लाईव्ह करण्यात आली आहे. म्हणजेच फोनची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाणार आहे.