iQOOचा नवीन स्मार्टफोन…लिक्विड कुलिंगसह विविध नवीन फीचर्सचा समावेश

| Updated on: Jun 04, 2022 | 9:34 PM

iQOO Neo 6 ने नवीन फीचर्स व टेक्नालॉजीवर आधारीत आपला स्मार्टफोन आणला असून याबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सूकता निर्माण झालेली आहे.

iQOOचा नवीन स्मार्टफोन...लिक्विड कुलिंगसह विविध नवीन फीचर्सचा समावेश
iQOO
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आयक्यूने (iQOO) भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. मिड-रेंज बजेट सेगमेंटवर लक्ष केंद्रीत करून कंपनीने iQOO Neo 6 बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट डिझाइन आणि वैशिष्ट्यांचा (features) समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला प्रीमियम डिझाइन आणि मिड-सेगमेंट स्पेसिफिकेशन्स मिळणार आहेत. कंपनीने यामध्ये जुनाच प्रोसेसर दिला असून कंपनीच्या मते यात उत्तम ट्युनिंगसह पॅक आहे. कोणत्याही प्रोडक्टची पहिली छाप त्याच्या डिझाइनवर अवलंबून असते. याच पध्दतीचा वापर या नवीन स्मार्टफोनमध्ये (new smartphone) करण्यात आला आहे. याची नवीन डिझाइन ग्राहकांना नक्की आकर्षित करीत असा विश्वास कंपनीकडून व्यक्त केला जात आहे.

नवीन वैशिष्ट्ये

स्मार्टफोनचा मागील पॅनल पॉली कार्बोनेटचा बनलेला असून तो ग्लॉसी फिनिशसह येतो. ज्यामुळे त्याचा लूक आकर्षक होतो. मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. उजव्या बाजूला तुम्हाला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर मिळेल. दरम्यान, कंपनीला बटनांची गुणवत्ता थोडी अधिक सुधारता आली असती. स्पीकर, टाईप-सी चार्जिंग पोर्ट आणि ड्युअल सिम (नॅनो) कार्ड असलेले सिम-ट्रे तळाशी दिलेले आहेत. कंपनीने या फोनमध्ये IR ब्लास्टर जोडले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही हँडसेटचा रिमोट म्हणूनही वापर करू शकता.

हे सुद्धा वाचा

लिक्विड कूलिंग फीचर्स

iQOO Neo 6 Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो. कंपनीने यामध्ये 6.62 इंचाची फुल एचडी + E4 AMOLED स्क्रीन दिली आहे. स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर देण्यात आला असून ते 12GB पर्यंत रॅम सह येते. यात लिक्विड कूलिंग फीचरही देण्यात आले आहे.

ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप

ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये 64MP कॅमेरा लेंससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून तो OIS सपोर्टसह येतो. यात 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. समोर 16MP लेंस उपलब्ध आहे. डिव्हाइस 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो फक्त तुम्ही हा स्टोरेज वाढवू शकत नाही. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे देण्यात आले आहे. 4700mAh बॅटरी आहे, जी 80W चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचे वजन 190 ग्रॅम आहे.  स्मार्टफोनमध्ये मोठा कॅमेरा देण्यात आला असल्याने हे त्याचे आकर्षण ठरत आहे.

काय आहे किंमत

दरम्यान, फास्ट चार्जिंगमुळे हा स्मार्टफोन काही प्रमाणात गरम होत असला तरी तेवढाच लवकर तो गारही होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. कंपनीने याची सुरुवातीची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे.