मुंबई : iQOO Z5 भारतात 23,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. चीनमध्ये लॉन्च झाल्यानंतर एका आठवड्यानंतर हे उपकरण भारतात सादर केले गेले आहे. इतर iQOO मॉडेल्स प्रमाणे, किफायतशीर किंमतीत शक्तिशाली फीचर्स असलेले मॉडेल कंपनीने सादर केले आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh ची बॅटरी समाविष्ट आहे. iQOO Z5 आता विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि भारतात शिपिंगसाठी तयार आहे. (IQOO Z5 Launched in India with Snapdragon 778G, 5000 mAh Battery, Know Price and Features)
नवीन iQOO स्मार्टफोन दोन फिनिश आणि दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंट iQOO Z5 हा स्मार्टफोन 23,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,990 रुपये असेल. हा स्मार्टफोन मिस्टिक स्पेस आणि आर्कटिक डॉन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. iQOO Z5 आजपासून म्हणजेच 27 सप्टेंबरपासून अमेझॉन इंडिया वेबसाइट आणि ऑनलाइन iQOO स्टोअरद्वारे उपलब्ध होईल.
इतर बातम्या
Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार
256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स
(IQOO Z5 Launched in India with Snapdragon 778G, 5000 mAh Battery, Know Price and Features)