आजच्या काळात iPhone हे केवळ स्मार्टफोन नसून एक स्टेटस सिम्बॉल बनलं आहे. त्याची कामगिरी, कॅमेरा, आणि सिक्युरिटी फीचर्समुळे अनेकजण iPhone खरेदी करत आहेत. मात्र या मागणीनं बनावट iPhone च्या विक्रीलाही चालना दिली आहे. विशेषतः ऑफलाइन बाजारात अनेकदा ग्राहक नकली iPhone घेतात आणि नंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येतं. म्हणून iPhone खरेदी करताना काही खास गोष्टी तपासणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊया iPhone खरा आहे की बनावट, हे ओळखण्याच्या ५ महत्वाच्या आणि सोप्या ट्रिक्स.
Apple चं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या Siri या व्हॉईस असिस्टंटला बनावट iPhone मध्ये योग्य प्रतिसाद देणं शक्य होत नाही. त्यामुळे iPhone मध्ये “Hey Siri” म्हणत हवामान, वेळ, अलार्म अशा साध्या गोष्टी विचारून तपासणी करा. जर Siri नी लगेच आणि योग्य प्रतिसाद दिला नाही, तर हा फोन खोटा असण्याची दाट शक्यता आहे.
प्रत्येक iPhone चा स्वत:चा सीरियल नंबर असतो. तो तुम्ही Settings मध्ये जाऊन मग General वर क्लिक करुन About मध्ये जाऊन पहाता येऊ शकतो. तो “Check Coverage – Apple” या अधिकृत वेबसाइटवर टाका. जर “Invalid Serial Number” असा मेसेज आला, तर फोन खोटा आहे आणि “valid Serial Number” आला तर तो iphone खरा आहे
बनावट iPhone मध्ये जॅमरोस्कोप, कंपास, अशा हार्डवेअर फीचर्सचा अभाव असतो. त्यामुळे “Sensor Test” किंवा “Gyroscope Test” अॅप्स डाउनलोड करून फोनमधील सेन्सर्सची कामगिरी तपासू शकता. जर हे फीचर्स योग्य प्रकारे काम करत नसतील, तर फोन बनावट असण्याची शक्यता आहे.
iPhone खराखुरा असेल तर तो कॉम्प्युटरशी iTunes किंवा Finder वर लगेच कनेक्ट होतो. जर तुमचा डिव्हाइस डिटेक्ट होत नसेल, तर तो फेक असू शकतो. हा एक सोपा पण प्रभावी टेस्ट आहे जो तुम्ही सहज रित्या करु शकता
Apple चं “Measure” अॅप केवळ खऱ्या iPhone मध्येच AR तंत्रज्ञानाद्वारे योग्य काम करतं. हे अॅप फोनमध्ये आधीपासून असतं किंवा App Store वरून डाउनलोड करता येतं. जर हे अॅप नसेल किंवा डाऊनलोड करुनही काम करत नसेल, तर तुमचा iPhone बनावट असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.