मुंबई : आपला स्मार्टफोन पोर्टफोलिओ मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारतातील विश्वासू स्मार्टफोन ब्रँड itel ने बुधवारी A-series अंतर्गत itel A26 हा नवीन स्मार्टफोन 5,999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला. आयटेल A26 एक व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन आहे. यात मोठा एचडी+ वॉटरड्रॉप डिस्प्ले, 2 जीबी रॅम आणि पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. (Itel A26 Budget Smartphone launched With Face Unlock, know Price, Specifications)
या स्मार्टफोनमध्ये स्मार्ट फेस-अनलॉक आणि लेटेस्ट सिक्योरिटीसह एक टेक फ्रेंडली डिव्हाईस युजर्सना मिळेल. नवीन स्मार्टफोन itel एक विशेष सोशल टर्बो फीचरने सुसज्ज स्मार्टफोन आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंग, पीक मोड, कॉल अलर्ट आणि स्टेटस सेव्हिंगचा समावेश आहे.
हा स्मार्टफोन वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफरच्या सर्विस अश्योरन्ससह येतो, जेथे ग्राहक स्मार्टफोन खरेदीनंतर 100 दिवसांच्या आत तुटलेली/फुटलेली स्क्रीन विनामूल्य वन-टाइम रिप्लेस करुन घेऊ शकतात.
इतर बातम्या
Apple iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max च्या भारतीय खरेदीदारांना धक्का, शिपिंग उशिरा होणार
स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह 27 सप्टेंबरला ढासू स्मार्टफोन लाँच होणार, जाणून घ्या दमदार फीचर्स
र्षअखेर Google Pixel Fold लाँच होणार, LTPO OLED डिस्प्लेसह सुसज्ज डिव्हाईस
(Itel A26 Budget Smartphone launched With Face Unlock, know Price, Specifications)