जिओ, एअरटेलने दर वाढवताच लोकांनी निवडला हा पर्याय? अचानक बदलली हवा

| Updated on: Jul 21, 2024 | 9:26 AM

रेटिंग एजेंसी ICRA चे प्रमुख अंकित जैन यांनी म्हटले की, खासगी कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे लोक बीएसएनएलकडे जाणार आहे. परंतु ही संख्या मोठी नसले. त्यामुळे या कंपन्यांच्या व्यवसाय आणि नफ्यावर मोठा परिणाम होणार नाही.

जिओ, एअरटेलने दर वाढवताच लोकांनी निवडला हा पर्याय? अचानक बदलली हवा
Follow us on

खासगी टेलीकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनने आपल्या प्लॅनचे दर वाढवले. त्यामुळे ग्राहकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. काही ग्राहकांनी नवीन पर्याय शोधले आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांनी वाढवलेल्या या दराचा फायदा बीएसएनएल या सरकारी कंपनीला झाला आहे. जिओ, एअरटेलपेक्षा बीएसएनएलचे प्लॅन स्वस्त असल्यामुळे ग्राहक तिकडे वळत आहे. बीएसएनएल गेल्या आठवड्भरात लाखोंनी नवीन ग्राहक मिळाले आहे.

बीएसएनएलकडे लाखोंच्या संख्येने नवीन ग्राहक

बीएसएनएलने म्हटले आहे की, 4 जुलैनंतर त्यांच्या 2.5 लाख ग्राहक आले आहे. हे सर्व ग्राहक दुसऱ्या कंपनीतून पोर्ट करुन आले आहेत. तसेच बीएसएनएलने नवीन 25 लाख कनेक्शन दिले आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची सांगितले की, नवीन ग्राहक त्यांना यामुळे मिळत आहे की त्याचे प्लॅन इतरांपेक्षा स्वस्त आहे. अनेक जण कमी खर्चाच्या बीएसएनएलच्या प्लॅनची निवड करत आहे.

खासगी कंपन्यांनी किती वाढवले दर

खासगी कंपन्यांनी आपल्या प्लॅनचे दर 11% ते 25% वाढवले आहे. यापूर्वी एअरटेल, व्होडाफोनचे 28 दिवसांचा सर्वास स्वस्त प्लॅन 199 रुपयांमध्ये होता. जिओचा प्लॅन 189 रुपयांमध्ये होतो. मात्र बीएसएनएलचा प्लॅन फक्त 108 रुपयांमध्ये आहे. तसेच 107 रुपये ते 199 रुपयांपर्यंत बीएसएनएलचे 4-5 प्लॅन आहेत. ते इतर कंपन्यांच्या प्लॅनच्या तुलनेत स्वस्त आहेत. खासगी कंपन्यांनी दर वाढल्यामुळे सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दुसरीकडे जगात सर्वत्र स्वस्त भारतात मोबाईलचे प्लॅन असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

खासगी कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार का?

रेटिंग एजेंसी ICRA चे प्रमुख अंकित जैन यांनी म्हटले की, खासगी कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे लोक बीएसएनएलकडे जाणार आहे. परंतु ही संख्या मोठी नसले. त्यामुळे या कंपन्यांच्या व्यवसाय आणि नफ्यावर मोठा परिणाम होणार नाही. बीएसएनएलने अजूनही सर्वत्र 4G सेवा सुरु केली नाही. त्याचवेळी खासगी कंपन्या 5G सेवा सर्वत्र सुरु करण्याच्या प्रयत्नात आहेत.