मुंबई : कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता, बहुतेक लोक सध्या घरून काम करत आहेत. बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवणे सुरु केले होते, मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत त्यांचा इंटरनेट वापरही लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे बरेच युजर्स चांगले ब्रॉडबँड प्लॅन्स शोधत आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि सरकारी मालकीच्या BSNL सारख्या दूरसंचार कंपन्या त्यांची ब्रॉडबँड सेवा विविध किंमतींच्या श्रेणींमध्ये देतात. घरून काम करणाऱ्यांसाठी या कंपन्यांनी वेगवेगळे प्लॅन्स सादर केले आहेत. (JIO and Airtel best broadband plans for Work from Home)
एअरटेल तीन ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करते, ज्यामध्ये एंटरटेनमेंट 999 रुपये, स्टँडर्ड, ज्याची किंमत 799 रुपये आहे आणि बेसिक, जो 499 रुपयांचा प्लॅन आहे. तिन्ही प्लॅन्स स्वतंत्र OTT सबस्क्रिप्शनसह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल/STD कॉलसह येतात.
पहिला एंटरटेनमेंट ब्रॉडबँड प्लॅन 200mbps पर्यंत अनलिमिटेड इंटरनेट स्पीड ऑफर करतो. टेलको कंपनी Amazon प्राइम सबस्क्रिप्शनसह एअरटेल थँक्स बेनिफिट्सचा अॅक्सेस देते. याशिवाय युजर्स Shaw academy आणि Wynk Music च्या सब्सक्रिप्शनचा लाभ घेऊ शकतात.
दुसरा स्टँडर्ड प्लॅन 799 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, जो 100 Mbps पर्यंत अनलिमिटेड इंटरनेट स्पीड ऑफर करतो. यामध्ये एअरटेल थँक्स बेनिफिट्सचा अॅक्सेस मिळतो. याशिवाय युजर्स Shaw academy आणि Wynk Music च्या सब्सक्रिप्शनचा लाभ घेऊ शकतात.
एअरटेलचा तिसरा प्लॅन हा बेसिक प्लॅन आहे जो Shaw academy आणि Wynk Music च्या सबस्क्रिप्शनसह 40 Mbps पर्यंत अनलिमिटेड इंटरनेट स्पीड ऑफर करतो.
रिलायन्स जिओ ब्रॉडबँड प्लॅन्स 399 रुपये, 699 रुपये आणि 999 रुपये किंमतीच्या टॅग्जमध्ये वेगवेगळ्या स्पीड लिमिटसह येतात. 399 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांसाठी 30mbps स्पीडसह येतो, 699 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांसाठी 100mbps स्पीड आणि 999 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांसाठी 150mbps स्पीड ऑफर करतो. तसेच यात तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एक वर्ष Amazon Prime चं सब्सक्रिप्शन मिळेल.
Jio चा आणखा एक ब्रॉडबँड प्लॅन 1499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, जो 30 दिवसांसाठी 300mbps स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट ऑफर करतो. यामध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमसह अनलिमिटेड व्हॉइस कॉलची सुविधा आहे. यासोबत जियोचा 2499 रुपयांचा आणखी एक मंथली प्लॅन आहे, जो रिलायन्सचा सर्वात महाग इंटरनेट प्लॅन आहे. हा प्लॅन 30 दिवसांसाठी 500 Mbps अनलिमिटेड हाय-स्पीड इंटरनेट ऑफर करतो. याव्यतिरिक्त यात नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन मिळते.
इतर बातम्या
Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…
Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…
(JIO and Airtel best broadband plans for Work from Home)