Jio IPL 2023 Cricket Plans : Jio ने क्रिकेट प्रेमींसाठी काही खास प्लान लॉन्च केले आहेत. ज्यामुळे तुम्हाला आयपीएल क्रिकेट सामने पाहताना डेटाबाबत आता चिंता करावी लागणार नाही. जिओने क्रिकेटप्रेमींसाठी डेटा अॅड-ऑन प्लॅनही आणला आहे. यामध्ये 150GB पर्यंत डेटा उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्ही 4K मध्ये क्रिकेटचा आनंद घेऊ शकाल. तुम्हालाही IPL 2023 चा आनंद घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला या नवीन प्लॅन्सची माहिती देत आहोत.
219 रुपयांचा प्लॅन (3GB डेली डेटा)
या प्लॅनची किंमत 219 रुपये आहे. ज्याची वैधता ही 14 दिवसांची असेल. यामध्ये दररोज 3GB डेटा दिला जात असून 25 रुपयांचे फ्री व्हाउचरही दिले जात आहे. हा सर्वात स्वस्त प्लान आहे.
399 रुपयांचा प्लॅन (3GB डेली डेटा)
दुसरा प्लान 399 रुपयांचा आहे, जो प्रीपेड प्लानमध्ये कंपनी संपूर्ण 28 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा देत आहे. यासोबतच 61 रुपयांचे फ्री व्हाउचरही उपलब्ध आहे.
999 रुपयांचा प्लॅन (3GB डेली डेटा).
या यादीतील सर्वात महागडा प्लॅन 999 रुपयांचा आहे आणि तो दररोज 3GB डेटा देखील देतो परंतु तो 84 दिवसांसाठी उपलब्ध आहे. तसेच 241 रुपयांचे व्हाउचर आहे.