आपल्या देशात अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. जेणेकरून अधिक ग्राहक त्यांच्याकडे वळतील. अलीकडेच प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओने त्यांचे अनेक प्लॅन महाग केले आहेत. या दरवाढीमुळे जिओ ग्राहक आता स्वस्तात अधिक बेनिफिट्स असलेले प्लॅन शोधत आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या एका प्लॅनची माहिती देणार आहोत, जे ग्राहकांना डेली डेटासोबत एक्स्ट्रा डेटा ची सुविधा देत आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅनबद्दल सविस्तर.
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला भरपूर डेली डेटा ॲक्सेस मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनची किंमत ८९९ रुपये आहे. कंपनीने त्यांच्या ८९९ रुपयांच्या प्लॅनसोबत धमाकेदार ऑफर आणली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेली डेटासोबत २० जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस पाठवता येणार आहेत.
जिओच्या ८९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ९० दिवसांची वैधता मिळते. जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. मात्र या ऑफरअंतर्गत तुम्हाला डेली डेटासोबत २० जीबी अतिरिक्त डेटा मोफत दिला जात आहे. त्यानुसार ९० दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण २०० जीबी डेटा मिळणार आहे.
या प्लॅन आणि ऑफर अंतर्गत तुम्हाला डेटाची कमतरता भासणार नाही. कारण दैनंदिन डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होऊन @64 केबीपीएस पर्यंत सुरु राहतो. त्यामुळे तुमचा डेटा संपल्यानंतर सुद्धा इंटरनेट काम करेल. जिओच्या या प्लॅनमध्ये डेटाव्यतिरिक्त अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज १०० फ्री एसएमएस पाठवता येणार आहेत. जर तुम्ही दीर्घ वैधता असलेला असा प्लॅन शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.