Jio Space Fiber | जिओच्या स्पेस फायबरचा जलवा, हे तंत्रज्ञान आहे तरी काय, किंमत तरी किती

| Updated on: Oct 27, 2023 | 3:46 PM

Jio Space Fiber | जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क याच्या Starlink ला भारतात कडवं आव्हान मिळू शकतं. जिओने भारतात नवीन तंत्रज्ञान आणलं आहे. हे तंत्रज्ञान 6G ची नांदी असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर काही जण हे त्यापेक्षा प्रगत आणि अति वेगवान तंत्रज्ञान असल्याचा दावा करत आहेत. नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान? कसा होईल त्याचा वापर?

Jio Space Fiber | जिओच्या स्पेस फायबरचा जलवा, हे तंत्रज्ञान आहे तरी काय, किंमत तरी किती
Follow us on

नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : Indian Mobile Congress 2023 मध्ये Jio ने त्यांच्या नवीन तंत्रज्ञानाची घोषणा केली. कंपनीने Jio Space Fiber लाँच केले. त्यामुळे देशात मोठी क्रांती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारला आणि अनेक संस्थांना, सर्वसामान्यांना या नव तंत्रज्ञानानाने मोठा फायदा होऊ शकतो. या आधुनिक तंत्रज्ञानाचा अमेरिकासह युरोपात चांगला परिणाम दिसून आला आहे. रिलायन्सच्या या तंत्रज्ञानाचा डेमो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिला आहे. नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान? त्याचा कशासाठी होईल वापर, त्याचा सर्वसामान्यांना काय फायदा होईल, असे अनेक प्रश्न सध्या अनेकांना पडले आहेत..

काय आहे हे तंत्रज्ञान

Jio Space Fiber माध्यमातून ग्राहकांना अंतराळातून, सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट उपलब्ध होईल. सॅटेलाईट आधारीत गीगा फायबर तंत्रज्ञानामुळे दूर्गम भागातही इंटरनेट मिळेल. त्यामुळे या भागातही अनेक सोयी-सुविधा सहज पोहचू शकतील. जिओ ही सेवा देशभरात किफायतशीर दरात पुरवणार आहे. सध्या Jio Fiber Broadband आणि Jio Airfiber या सेवा बाजारात उपलब्ध आहेत. हे दोन्ही गतिमान इंटरनेट सुविधा पोहचवत आहेत.

हे सुद्धा वाचा

जिओ स्पेस फायबरची सेवा सध्या कुठे?

भारतातील चार ठिकाणी सध्या जिओ स्पेस फायबरची सुविधा आहे. गुजरातमधील गिर नॅशनल पार्क, छत्तीसगडमधील कोरबा, उडिशातील नबरंगपूर आणि असममधील ONGC-जोरहाट ही ठिकाणं जोडण्यात आली आहे. कंपनीने Jio Space Fiber ची 27-29 ऑक्टोबर दरम्यान सुरु असलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये घोषणा केली आहे.

हे तंत्रज्ञान कसे करते काम?

Jio Space Fiber च्या मदतीने ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पोहचवण्यासाठी जिओ SIS कंपनीच्या सॅटेलाईट्सचा वापर करणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, जिओ स्पेस फायबरच्या माध्यमातून कधीही, कुठेही मल्टी गीगाबिटचे कनेक्शन मिळेल. सॅटेलाईट बेस्ट इंटरनेट सेवा दूर्गम भागात खास मदतीला येईल.

किती असेल किंमत

प्रगत तंत्रज्ञानाआधारे किफायतशीर दरात इंटरनेट पोहचविण्याची घोषणा जिओने केली आहे. पण इंटरनेट प्लॅन अथवा त्याविषयीच्या तंत्रज्ञानाविषयी कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. ही सेवा कोणत्याही ठिकाणी एका डिव्हाईसच्या मदतीने सुरु करता येणार आहे.