नवीन वर्षाला सुरूवात होण्याआधीच मुकेश अंबानींनी खेळला मोठा डाव, आता या क्षेत्रात उडणार खळबळ

| Updated on: Dec 28, 2023 | 3:23 PM

IIT बॉम्बेला सोबत घेऊन उद्योगपती अंबानी मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. रिलायन्स जियो इन्फोकॉमचे चेयरमन आकाश अंबानी यांनी खुलासा केला आहे.

नवीन वर्षाला सुरूवात होण्याआधीच मुकेश अंबानींनी खेळला मोठा डाव, आता या क्षेत्रात उडणार खळबळ
Mukesh Ambani Reliance Group
Follow us on

मुंबई : ChatGPT ला चांगलीच लोकप्रियता असल्याचं पाहायला मिळत आहे. ChatGPT ची ही वाढती लोकप्रियता पाहून रिलायन्स जिओ कंपनीने Bharat GPT लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तसंच मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम प्रगती ओएस नंतर रिलायन्स कंपनी आत टीव्हीसाठी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणार आहे. याबाबतची माहिती रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी दिली. तर यासाठी लवकरच रिलायन्स जिओ कंपनी आयआयटी बॉम्बे सोबत भागीदारी करणार आहे.

आयआयटी बॉम्बेच्या वार्षिक कार्यक्रमात रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारतीय भारत जीपीटी बद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी रिलायन्स जिओच्या व्हिजन 2.0 याबद्दलही माहिती दिली. तर आता रिलायन्स जिओचे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल मायक्रोसॉफ्ट आणि ओपन आईने तयार केलेल्या ChatGPT ला चांगलीच टक्कर देण्याची शक्यता आहे. याबाबत आकाश अंबानी यांनी महिती दिली.

भारत देशात तंत्रज्ञानाला पुढील स्तरावर नेण्यासाठी एक इको सिस्टीम तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी रिलायन्स जिओ ने जिओ 2.0 व्हिजन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओचे हे जनरेटिव्ह आर्टिफिशल इंटेलिजन्स टूल हे चॅट जीपीटीप्रमाणेच काम करणार आहे, असं आकाश अंबानी यांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या आकाश अंबानी यांनी या टूलबाबत फारशी माहिती दिलेली नाही. पण 2014 मध्ये रिलायन्स जिओनी आरटीफिशियल इंटेलिजन्स आणि लार्ज लैंग्वेज मॉडेल संदर्भात आयआयटी बॉम्बे सोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला होता.