न्यूयॉर्क : तंत्रज्ञान माणसाच्या सोयीसाठी आहे, की गैरसोयीसाठी, असा प्रश्न एका मातेला पडला आहे. याचं कारण म्हणजे ‘अॅलेक्सा’ला व्हॉईस कमांड देऊन तिच्या चिमुरड्या मुलींनी नाताळसाठी गिफ्ट्स खरेदी केली. अमेरिकेतील बालगोपाळांना आईच्या क्रेडिट कार्डवरुन थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल 40 हजार रुपये किमतीच्या वस्तू (Kids Use Alexa To Buy Gifts) विकत घेतल्या.
अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या माऊलीची गत ‘हसावं की रडावं?’ अशी झाली आहे. मुलांसाठी कोणतीही किंमत मोजायला मी तयार आहे, असं ही महिला म्हणालीही असेल. मात्र याचा अर्थ मुलं खरोखरच कोणत्याही किमतीची खेळणी विकत घेतील, असं तिला स्वप्नातही वाटलं नसेल.
महिलेचे एक दोन नव्हे तर तब्बल 100 पुरुषांसोबत प्रेमसंबंध, कारण ऐकून थक्क व्हाल!
तर त्याचं झालं असं, मिशिगनमधील दोन मुलांनी अतिउत्साहाने ‘अॅलेक्सा’ मार्फत सातशे डॉलर म्हणजे अंदाजे 40 हजार रुपये किमतीच्या गिफ्ट्स ऑर्डर केल्या. सुरुवातीला त्यांची आई वेरोनिका एस्टेल यांना वाटलं, की एखाद्या दिलदार व्यक्तीने आपल्या मुलांना खेळण्यांनी भरलेला बॉक्स गिफ्ट केला आहे. पण जेव्हा तिला समजलं, की मुलांनी आपलंच क्रेडिट कार्ड वापरुन पोरांनी खेळणी मागवण्याचा उपद्व्याप केला आहे, तेव्हा तिचा चडफडाट झाला.
वेरोनिकाच्या दोन्ही मुली आहेत पाच वर्षाच्या आतील. या वयात दोघी जणी असा काही डोक्याला ताप देतील, हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. आता मुलं देवाघरची फुलं आहेत किंवा खोडकर हे तिला कळेनासं झालंय.
‘स्मार्टफोन’च्या पिढीतील आजकालची मुलं खरोखरच स्मार्ट झाली आहेत. एक वर्षांचा मुलगा मोबाईल फोन ऑपरेट करु शकतो. तिथे चार-पाच वर्षांची मुले त्यांच्या पालकांची क्रेडिट कार्ड वापरुन खरोखर महागड्या भेटवस्तू का घेऊ शकणार नाहीत. म्हणूनच, आपल्या आसपास लहान मुलं असल्यास आपलं क्रेडिट कार्ड त्यांच्यापासून वाचवा आणि अॅलेक्साला कधीही मुलांच्या आदेशाचं पालन करण्यास सांगू नका, असा सल्लाही ‘तोंड पोळलेल्या’ मातेने दिला (Kids Use Alexa To Buy Gifts) आहे.