येणाऱ्या काही दिवसांत पाच राज्यांमध्ये उमेदवारांचे भाग्य ईवीएम मशीन (EVM Machine) मध्ये कैद होणार आहे. ईवीएम मशीन द्वारे आपल्याला समजते की कोणाच्या डोक्यावर विजयाचा मुकुट चढणार आहे. परंतु अनेकदा ईवीएम मशीन वर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात परंतु निवडणूक आयोगाद्वारे (Election commission) असे करणे संभव नाही. खरंतर या मशीनमध्ये एका चीपचा वापर केला जातो. ही चीप मशीन बद्दलची प्रायव्हसी राखून ठेवते. चला तर मग जाणून घेऊया या चीप बद्दल…ईवीएम मशीन मध्ये एक माइक्रोचीपचा (Microchip) वापर केला जातो, त्या चीपला मास्क्ड चीप असे म्हंटले जाते. याची विशेष बाब म्हणजे की एकदा उमेदवाराचा क्रम निश्चित केल्यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल करता येत नाही. या मशीनमध्ये बसवलेल्या चीप मुळे आपल्याला यातील कोणती माहिती वाचता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारची दुरुस्ती सुद्धा करता येत नाही तसेच या मशीनमध्ये आपण कोणत्याही प्रकारचे ओव्हर राइटिंग सुद्धा करू शकत नाही.
म्हणूनच या मशीनच्या बाबत जर तुम्ही स्वतः आधीच काहीतरी कराल आणि मत मिळण्यासाठी काही तरी फेरफार करण्याचा प्रयत्न कराल जेणेकरून उमेदवाराला जास्त मतं मिळतील अशा प्रकारची संभावना अगदी अशक्य आहे. त्याचबरोबर या मशीनमध्ये एखाद्या विशेष उमेदवाराला जास्त मतं मिळावी यासाठी विशेष क्रम सुद्धा तुम्ही निश्चित करू शकत नाही किंवा कोणत्याही बटण वर क्लिक केले तर आपले मत विशिष्ट उमेदवाराला मिळेल अशा प्रकारचा गोंधळ व हेराफेरी सुद्धा आपल्याला करता येत नाही. म्हणूनच या मशीन मध्ये एकदा क्रम ठरवल्यावर कोणत्याच प्रकारचा बदल करता येत नाही.
याशिवाय ईवीएम मशीन पूर्णपणे वेगळ्या प्रकारची मशीन असते. त्या मशीनला कोणत्याही प्रकारच्या नेटवर्कने किंवा एखाद्या बाह्य उपकरणसोबतच जोडलेले नसते आणि या मशीनमध्ये कोणत्याही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर सुद्धा केला जात नाही.
म्हणूनच एखाद्या उमेदवाराबद्दल किंवा एखाद्या राजकीय पार्टीला मत मिळावे या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा क्रम ठरवण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही तसेच अशा प्रकारची कोणतीच सेटिंग मशीन मध्ये केली जात नाही.
त्याचबरोबर जेव्हा वोटर म्हणजेच मतदार जेव्हा आपले मत देण्यासाठी मशीन वरील बटण वर क्लिक करतो त्यांनतर ती मशीन काम करणे बंद करते आणि पुन्हा या मशीनला दुसऱ्या हिस्सा द्वारे चालू केले जाते. यामुळे एक व्यक्ती एकदाच आपले मत मशीनच्या माध्यमातून देऊ शकतो. त्याचबरोबर या मशीन द्वारे आपण एकदाच मतदान केल्यानंतर वारंवार आपल्याला मत देण्याचा अधिकार नसतो.