दिल्ली : राजस्थानमधील कोटा रेल्वे विभागाने अलीकडेच रेल्वेच्या वेगा बाबतीत एक नवीन इतिहास रचला आहे. गुरुवारी कोटा रेल्वे मंडळामध्ये 180 किलोमीटर वेगाने रेल्वेचे दोन डबे रुळावर धावले. 180 च्या वेगाने धावणाऱ्या रेल्वेला गायीची धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे या घटनेनंतर कोणताही मोठा अपघात झाला नाही. मात्र, या घटनेने रेल्वे चाचणीला धक्का बसला आहे. फक्त या घटनेला वगळता 180 च्या वेगाने रेल्वेचे परीक्षण यशस्वी झाले. (kota department has a history of running trains at a speed of 180 km per hour)
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वे चाचणीसाठी प्रथम नागदा येथे रेल्वे नेण्यात आली. येथून रेल्वेला चाचणीसाठी पाठविण्यात आले. रामगंजमंडी ते मोड़क दरम्यान 180 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वेला अचानक गायीची धडक झाली. यामुळे जवळपास 25 मिनिटे रेल्वे त्याचठिकाणी उभी राहिली. गाईंच्या धडकेत केटल गार्ड आणि इंजिनचे किरकोळ नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेनंतर पुन्हा गाडी 180 किमी वेगाने धावली. कोटा येथे रेल्वे आल्यानंतर चाचणी पूर्ण झाली. लबान स्टेशनपर्यंत या रेल्वेची चाचणी घेण्यात येणार होती.
यापूर्वी 2018 मध्ये वंदेभारत देखील 180 किमी वेगाने चालविण्यात आली होती.
यापूर्वी 2018 मध्ये कोटा विभागातही वंदेभारत रेल्वे 180 किमी वेगाने चालवली गेली होती. या ट्रेनमध्ये स्वतंत्र इंजिन नव्हते. कोचच्या केवळ एका भागात इंजिन बसविण्यात आले होते. ती रेल्वे जास्तीत जास्त 200 किलोमीटर ताशी वेगाने धावण्यासाठी डिझाइन केली गेली होती. मात्र, स्वतंत्र इंजिनसह 180 किलोमीटर वेगाने रेल्वे चालवण्याची ही पहिलीच वेळ होती. या रेल्वेमध्ये इंजिन व्यतिरिक्त विशेष डिझाइनचे दोन डबे जोडलेले होते.
संबंधित बातम्या :
SBI ग्राहकांसाठी बँकेचा अलर्ट! KYC पडताळणीसाठी फोन किंवा मेसेज आला तर सावधान
27 रुपयांचे पेट्रोल तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत 83 रुपयांचे कसे होते?
(kota department has a history of running trains at a speed of 180 km per hour)