नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावाने आज (मंगळवार) 5G कनेक्टिव्हिटीसह आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईल फोनचे नाव आहे Lava Agni 5G. उत्कृष्ट वैशिष्ट्ये असणारा हा फोन बाजारात दाखल झाला आहे. मुख्य वैशिष्ट्यांबाबत बोलायचे तर यात 5G टेक्नेलॉजी देण्यात आली आहे. तसेच यात मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसरही देण्यात आले आहे. शिवाय यामध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा दिला आहे. सुंदर डिझाईन आणि रेक्टँगुलर कॅमरा सेटअप दिले आहे.
Lava Agni 5G ची किंमत 19999 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. मात्र कंपनीतर्फे सध्या स्पेशल डिस्काउंट दिले जाणार आहे, यानंतर याची किंमत 17999 रुपये होईल. हा स्मार्टफोन लावाची अधिकृत वेबसाइटवरुन प्री बुक करता येईल. हा स्मार्टफोन विक्रीसाठी केव्हा उपलब्ध होईल, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. हा फेयरी ब्लू रंगामध्ये येतो.
Lava Agni 5G मध्ये 2.5D वक्र ग्लाससह 6.78-इंच फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 1080×2460 रिझोल्युशनसह येतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईलमध्ये MediaTek Dimension 810 चिपसेट दिला आहे. तसेच, यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन Android 11 वर बॉक्सच्या बाहेर काम करतो.
Lava Agni 5G च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, बॅक पॅनल वर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्राथमिक कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे. यात 5 मेगापिक्सल्सचा दुय्यम कॅमेरा आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. यासोबतच इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहेत तसेच फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो स्क्रीन फ्लॅश फीचर्ससह येतो. यामुळे कमी प्रकाशातही चांगले फोटो क्लिक करण्यात मदत होईल.
Lava Agni 5G च्या बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000 mAh Li-Polymer बॅटरी आहे, जी 30W फास्ट चार्जिंग क्षमतेसह येते. तसेच या स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. यात OTG सपोर्ट, ब्लूटूथ v 5.1 आणि टाइप सी यूएसबी कनेक्टिव्हिटी ही वैशिष्ट्ये आहेत. (Lava Agni 5G Launched In India With Strong Battery And MediaTek Processor, know Price And Features)
48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Motorola चा बजेट स्मार्टफोन बाजारात, किंमत…
POCO M4 Pro 5G आज लाँच होणार, जाणून घ्या नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये काय असेल खास